Pages

Thursday 22 September 2016

अशी भरा आधारकार्ड माहिती


आधार अत्यंत महत्त्वाचे
पोस्ट क्रमांक 1)

                  
आधारकार्ड Excel Files डाउनलोड करून माहिती भरण्याची पद्धत (procedure)

सर्वात अगोदर Student portal वर जाऊन आपला User ID व password टाकून login करावे.

आता स्क्रीन वरील Excel tab ला टच करा.

 आता यामधील  UID Download वर CLICK करा.

 आपल्या शाळेतील वर्ग निवडा व Download वर click करा. फाईल स्क्रीन च्या खालील बाजूस डाउनलोड झालेली दिसेल.*

अशाच पद्धतीने आपल्या शाळेतील प्रत्येक वर्गाच्या एक्सेल file download करुन घ्या. सर्व फाईल्स डाउनलोड करून घेतल्या की ती स्क्रीन बंद करा.

सर्व फाईल डाउनलोड झाल्यावर नेट डाटा बंद करावा. कारण फाईल मध्ये माहिती भरण्यासाठी नेटची गरज नाही.

 ह्या Download झालेल्या file आपल्या PC किंवा laptop च्या Download फोल्डर असतात. ते फोल्डर ओपन करा.

 आता तुम्हाला ज्या वर्गाची माहिती भरायची आहे ती फाईल ओपन करा.चुकुन एखादी पट्टी आली तर त्या ठिकाणी Yes वर click करा.

 आता फाईल ओपन झाली आहे. वरच्या बाजूला आडव्या पिवळ्या पट्टी मध्ये *enable edit* वर click करा. हा OPTION नसेल तर नो प्रॉब्लेम.

आता त्या फाईल मध्ये J हा कॉलम select करा.व right clik करा आणि यामधील *format cells ला click करा.

आता यामधील  Text ला क्लिक करा.व  ok बटण दाबा.

आता आपली फाईल आधारकार्ड वरील माहिती भरण्यासाठी ready झाली आहे.

 आता हे लक्षात घ्या की मुलाच्या आधारकार्ड वर जशी माहिती असेल ती तशीच भरा. कोणत्याही परिस्थितीत दुरूस्ती वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नका.

 आधार नंबर अगदी बारकाईने लक्ष देऊन भरा. एक जरी अंक चुकला तरी त्या मुलाचा आधार नंबर match होणार नाही.

 नाव लिहिताना काही मुलांचे नाव उदा. @ निलेश शिंदे  @असे असू शकते. अशा वेळी middle name मध्ये काही लिहू नका. तो रकाना blank सोडा. अगदी तुम्हाला माहित असले तरी सुद्धा.

 आधारकार्ड वर जन्मतारीख पुर्ण नोंदलेली असेल उदा. 10/05/2005 अशी असेल तरच भरा. फक्त वर्ष नोंदलेले असेल उदा. 2008 तर अशा वेळी जन्मतारीख रकान्यात काही न लिहिता तो blank सोडा.

 Male, female जसे आधारकार्ड वर असेल तसेच सिलेक्ट करा व नोंदवा.


आता डाव्या कोपर्‍यात File नावावर click करा. त्यामधील त्यानंतर save as वर click केल्यानंतर other formats निवडा. (काही मित्रांना other formats दिसला नाही तर गडबडून जाऊ नये)

आता file name च्या ठिकाणी त्या फाईल्स चे मुळ नाव आलेले असेल.

 जर मुळ नाव आलेले नसेल तर फाईल नाव ज्या रकान्यात लिहायचे आहे तेथे फक्त *U* हे अक्षर टाईप करा. लगेच खाली नावे येतात. त्यामधील *आपण ज्या वर्गाची फाईल Save as करत आहोत त्याच वर्गाचे नाव सिलेक्ट करा.* लक्षात घ्या की नावात गडबड झाली की अपलोड करताना Error येणार.

आता फाईल नेमच्या खालील रकान्यात click करा व त्यामधील CSV Comma Delemited वर click करा.

आता त्याखालीच Save बटनावर क्लिक करा.तुमची ही csv केलेली फाईल Download फोल्डर मध्ये दिसेल. ती अपलोड करण्यासाठी ready झाली आहे.

 पण कोणत्याही परिस्थितीत CSV केलेली File ओपन करून बघू नका. आहे तशीच upload करायची आहे. जर तुम्ही अनवधानाने ओपन करून पाहिली तर ती फाईल upload करताना Error येईल व तुमची सर्व मेहनत वाया जाईल..


फाईल upload करण्यासाठी पद्धत

पुन्हा Student portal वर जाऊन आपला User ID व password टाकून login करावे.

आता स्क्रीन वरील Excel tab ला टच करा. व यामधील UID Upload वर CLICK करा.

 *Browser... ला click करून आपली फाईल ज्या ठिकाणी ठेवलेली आहे ते फोल्डर निवडा.
*File select* करा. खाली *Open* ला click करा..

आता file आली आहे. समोरच्या *upload* बटणावर click करा.

 *8 students inserted successfully* असा मेसेज आला की समजायचे आपली फाईल यशस्वीपणे अपलोड झाली. *(8च्या जागी तुम्ही जेवढ्या मुलांची आधार माहिती भरली ती संख्या दिसेल)*

 *अशी प्रोसेस प्रत्येक वर्गाच्या फाईलसाठी करायची आहे.
==================================================


(पोस्ट क्रमांक 2)
      
  save as करताना फाईल नाव सोप्या पद्धतीने कसे घ्यावे?
  
*उत्तर* - अगदी सोपे आहे. फाईल नाव ज्या रकान्यात लिहायचे आहे तेथे फक्त *U* हे अक्षर टाईप करा. लगेच खाली नावे येतात. त्यामधील *आपण ज्या वर्गाची फाईल Save as करत आहोत त्याच वर्गाचे नाव सिलेक्ट करा.* लक्षात घ्या की नावात गडबड झाली की अपलोड करताना Error* येणार.

 *मित्रांनो फाईल अपलोड करताना अनेकदा Error येत आहे. अशा वेळी कोणती काळजी घ्यावी?*

 *मित्रांनो आधार फाईल्स अपलोड Error चे प्रमाण खूप वाढले आहे. अशा वेळी आपल्याला संपूर्ण माहिती पुन्हा नव्याने भरावी लागते आणि यामध्ये आपल्याला प्रचंड मनस्ताप होतो. सर्वच डाटा पुन्हा भरणे सोपी गोष्ट नाही.*
    *तसेच अनेकदा वर्गात जर जास्त मुले असतील तर सर्व मुलांची माहिती एकाच वेळी भरणे शक्य होणार नाही अशा वेळी जेवढ्या मुलांची माहिती भराल त्यावेळी फाईल नेहमीच्या साध्या पद्धतीने Save करा. (save as नाही बरं का) त्यानंतर पुन्हा पुढच्या वेळी राहिलेली माहिती भरा. सर्व माहिती भरल्यानंतर परत एकदा साध्या पद्धतीने Save करा.*
    *आता सर्वात महत्वाची गोष्ट करायची आहे. तुमची फाईल ज्या फोल्डर मध्ये आहे. तिथे या आणि आपण साध्या पद्धतीने Save करून ठेवलेल्या फाईल copy करा आणि PC, Laptop च्या दुसर्‍या Drive मध्ये किंवा pendrive यामध्ये paste करून घ्या. म्हणजे आपला भरलेला डाटा 100% सुरक्षित झाला.*
     *हे केल्यानंतर आता आपण भरलेली मूळ फाईल ओपन करा. आणि ही फाईल Save as करून csv comma delimited मध्ये CONVERT करा.*
         *अशी प्रोसेस केल्याने जरी फाईल अपलोड केल्यानंतर Error आला तरी दुरूस्ती करण्यासाठी आपल्याला सर्व माहिती पुन्हा नव्याने भरायची गरज लागणार नाही कारण ही फाईल आपण दुसरीकडे Save करून ठेवलेली आहे.*
     *Error आला की काय चुकले ते दुरूस्त करावे लागेल. मग आपण दुसरीकडे Save करून ठेवलेली फाईल उघडा आणि दुरूस्ती करून Save as ची प्रोसेस करून फाईल पून्हा अपलोड करा.*
   हे सर्व करताना घ्यायची काळजी
*फाईल Error आली की आपल्याला दुरूस्ती करायची आहे. ही करताना आपण त्या वर्गाची अगोदर csv केलेली फाईल delete करून टाका आणि मगच दुसरीकडे Save करून ठेवलेल्या फाईल मध्ये नवीन दुरुस्ती करा.आणि नवी फाईल अपलोड करुन टाका.*

 file upload केल्यानंतर longer file name असा error आला तर काय करावे?

उत्तर - 
असा Error आलेली फाईल ज्या फोल्डर मध्ये ठेवली आहे ते फोल्डर ओपन करा. आपली फाईल कोठे आहे ते बघा. त्या फाईल च्या नावावर Right click करा. आणि नावात थोडा बदल करा. *लक्षात ठेवा की हे पूर्ण नांव delete करायचे नाही. फक्त त्यातील काही भाग कट करुन छोटे करायचे आहे.*
    उदा. पूर्वी चे 2री च्या वर्गाच्या फाईलचे नाव *UID27260607202_02_0_(3)* असे आहे तर यामध्ये बदल कसा केला ते खाली बघा.
*UID27260607202_02_0* 
म्हणजे तुमच्या लक्षात येईल की *शून्याच्या पुढे काहीच ठेवायचे नाही.* आता Enter दाबा. फाईल्स चे नाव ओके होईल. आता ही फाईल अपलोड करा.

 आधारकार्ड Excel file download करताना शाळेतील काही वर्गाच्या तुकडीतील मुलांची नावे येत नाही अशा वेळी काय करावे?

उत्तर -  
 मित्रांनो तुमच्या शाळेत समजा मागील वर्षी 3 री च्या A व B अशा 2 तुकड्या होत्या व 4 थी ची 1 च तुकडी होती. अशा वेळी 3री मधील मुले 4थी ला आली. पण सरल रेकॉर्ड ला तर 4थी ची एकच तुकडी कार्यरत असल्याने मागील एकाच तुकडीतील मुले फक्त A तुकडीत दिसतात. पण 4 थी ची B तुकडी सरलला नोंदणी केलेली नसल्याने मागील 3री B मधील मुले मुले कोठेच दिसत नाही व आधार डाउनलोड फाईल मध्ये सुद्धा येत नाही.
    म्हणून अशा वेळी आपल्याला 4थी च्या B तुकडीची सरल मध्ये अॉनलाईन निर्मिती करावी लागणार आहे. याची प्रोसेस खालीलप्रमाणे आहे.
1) Student portal open ला लॉगिन करा.
2) Master tab मधून division निवडा.
3) Standard 4 थी निवडा.
4) तुकडी टाकताना *B* न विसरता टाका.
यामधील बाकी सर्व माहिती सिलेक्ट करा. शेवटी सध्याच्या B तुकडीतील मुलांची संख्या टाका व खालील *Add* बटनाला  क्लिक करा. *Successfully* असा मेसेज येईल.
       आता तुमची 4थी ची B तुकडी तयार झाली. ही माहिती अपडेट होण्यास थोडा वेळ लागेल. *नंतर आपोआप मागील वर्षीच्या 3री B तुकडीची मुले 4थी B तुकडीत येतील.* व आधार Excel डाउनलोड फाईल मध्ये पण मुले येतील. 
====================================================



(पोस्ट क्रमांक 3)
(पोस्ट मोठी आहे पण काळजीपूर्वक वाचा. आपल्या शंकांचे निरसन होईल.
 डाउनलोड केलेल्या फाईल मधील सर्वच मुलांचे आधारकार्ड उपलब्ध नसेल तर काय करावे*

 उत्तर
सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की आपल्याला 100% मुलांचे आधार माहिती भरायची आहे. पण जर काही कारणाने सर्वच मुलांची आधार माहिती उपलब्ध नसेल तर जेवढ्या मुलांची माहिती उपलब्ध आहे तेवढ्या मुलांची माहिती भरून ती फाईल लगेच अपलोड करावी. त्यानंतर राहिलेल्या मुलांची माहिती जमा करावी. आणि पुन्हा एकदा फाईल डाउनलोड करून पुन्हा राहिलेल्या मुलांची माहिती भरण्यासाठी हीच प्रोसेस परत एकदा करायची आहे.

 मागील वर्षी आधार नंबर बरोबर असलेल्या मुलांची माहिती कोठे पाहावी?

  उत्तर- 
Student portal open केल्यानंतर Report tab मधील HM Level दिसते. त्यातील Adhar Report ला click करा.यामध्ये  All Adhar निवडा. आता तुम्हाला ज्या वर्गाची माहिती पाहायची आहे तो वर्ग टाका. तुकडी निवडा. खालील Show report ला click करा.*
       आता तुम्हाला तुमच्या वर्गातील सर्व मुले दिसतात. ज्या मुलांच्या पुढे valid Adhar असे दिसते. अशा मुलांचे आधार नंबर योग्य आहे हे आपल्याला कळेल.

 आधार च्या डाउनलोड केलेल्या Excel file मध्ये पटसंख्येपेक्षा मुले कमी का दिसतात?

  उत्तर - 
मागील वर्षी आपण मुलांची माहिती भरलेली होती. त्यामधील काही मुलांचे आधार नंबर valid (म्हणजे बरोबर) झालेले होते. ज्या मुलांचे आधार नंबर बरोबर आहेत अशा मुलांची नावे परत आधार नंबर भरण्यासाठी येणार नाहीत. म्हणून मुलांची नावे कमी दिसतात.

 आणि आधार डाउनलोड फाईल मध्ये जर मुले कमी दिसत असली तर काय करावे?

  उत्तर - मुले कमी दिसत असली तरी आपण त्याठिकाणी वाढीव मुले अॅड करू शकत नाही. म्हणून डाउनलोड फाईल मध्ये जे मुलं दिसत असतील तेवढ्या मुलांची आधार माहिती भरून फाईल अपलोड करुन टाका.

 file upload केल्यानंतर longer file name असा error आला तर काय करावे?

  उत्तर -
 असा Error आलेली फाईल ज्या फोल्डर मध्ये ठेवली आहे ते फोल्डर ओपन करा. आपली फाईल कोठे आहे ते बघा. त्या फाईल च्या नावावर Right click करा. आणि नावात थोडा बदल करा. *लक्षात ठेवा की हे पूर्ण नांव delete करायचे नाही. फक्त त्यातील काही भाग कट करुन छोटे करायचे आहे.*
    उदा. पूर्वी चे 2री च्या वर्गाच्या फाईलचे नाव UID27260607202_02_0_(3) असे आहे तर यामध्ये बदल कसा केला ते खाली बघा.
UID27260607202_02_0 
म्हणजे तुमच्या लक्षात येईल की शून्याच्या पुढे काहीच ठेवायचे नाही. आता Enter दाबा. फाईल्स चे नाव ओके होईल. आता ही फाईल अपलोड करा.
   
 आधारकार्ड चुकीची माहिती असली तरीही आपल्याला भरायची आहे. यामुळे आपल्या शाळेचा विद्यार्थी डाटा बदलेल का?
                          
 उत्तर -
 *अजिबात बदलणार नाही.* आपण हे लक्षात घ्या की आधारकार्ड वरील जशी आहे तशी माहिती भरण्यामागे एकच उद्देश आहे की ही माहिती *UID department* कडे *Verification* साठी जाणार आहे. आपण जशी आहे तशी माहिती भरल्यामुळे आपल्या मुलांचे आधार नंबर *valid* (म्हणजे बरोबर) ठरतील. आणि *तो मुलगा किंवा मुलगी हे याच शाळेत शिक्षण घेत आहेत हे सिद्ध करणे हाच शासनाचा हेतू आहे.*

विद्यार्थी आधार माहिती भरली की ती  uid मध्ये दिसते. पण आधार रिपोर्ट मध्ये दिसत नाही यासाठी काय करावे लागेल?

  उत्तर - 
आपण भरलेली माहिती ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर *UID department कडे Verification साठी जाणार आहे.* त्यांच्याकडून *Verification* झाल्यानंतरच त्याचा *Report* आधार रिपोर्ट मध्ये येईल. यासाठी मोठा कालावधी लागतो. म्हणून *आपण भरलेली माहिती लगेच आधार रिपोर्ट मध्ये येऊ शकत नाही. म्हणून आपल्याला ही माहिती UID Details मधून दिसते.*


आधारकार्ड Excel Files अपलोड केल्यानंतर भरलेली माहिती पाहण्यासाठी पद्धत (procedure)

     *मित्रांनो आपण वेबसाईटवर आधार माहिती भरल्यानंतर सर्वसाधारणपणे ही माहिती सरल सिस्टीम ला अपडेट होण्यासाठी काही वेळ लागत असतो.*
    *वेबसाइट ला लोड नसेल तर ही माहिती लगेचच अपडेट होते. व आपण लगेच पाहू शकतो. पण काही वेळा ही माहिती अपडेट होण्यासाठी 24 तासही लागू शकतात.*
                           पद्धत
 *सर्वात अगोदर https://student.maharashtra.gov.in वर जाऊन (ही वेबसाईट लगेच ओपन होते) आपला User ID व password टाकून login करावे.*

 *आता स्क्रीन वरील Report tab ला टच करा.*

 आता यामधील HM LEVEL मधील *UID Details* वर CLICK करा.

 *आपल्या शाळेतील ज्या वर्गाची आपण माहिती पाहणार आहोत तो वर्ग निवडा व Go ला click करा. थोडा वेळ लागेल. भरलेली माहिती स्क्रीनवर दिसेल.*

 *अशाच पद्धतीने आपल्या शाळेतील आपण आधार माहिती अपलोड केलेल्या प्रत्येक वर्गाची माहिती तपासून बघा.
=====================================================

(पोस्ट क्रमांक 5)

       
           एवढ्या पोस्ट केल्या पण अजूनही आधार बाबतीत काही मित्र शॉर्ट कट वापरून माहिती भरण्यासाठी प्रयत्न करतात आणि मग त्याचा परिणाम आधार फाईल अपलोड करताना Error येत आहे. म्हणून ही पोस्ट टाकण्याची वेळ आली. पण काही हरकत नाही. खाली देत असलेल्या गोष्टी काळजीपूर्वक वाचा आणि येत असलेल्या Error वर मात कराल अशी आशा आहे.*

    आधार डाउनलोड फाईल भरतांना घ्यायची काळजी

1)  *सर्वप्रथम 'J' कॉलम सिलेक्ट करून Format cell ची प्रोसेस नीट झाली आहे याची खात्री करा. प्रोसेस नीट झाली नाही तर अंक सलग न दिसता 2.456+ असे दिसतात.*

2) *आधार अंक स्पेस न देता सलग टाईप करा.*

3) *मुलाचे First name आधारकार्डवर उलटे असले तरी तुम्ही सोईचेच लिहा. उदा. More Ganesh असे असेल तरी first name 'Ganesh' लिहा.शिवाय वरील नावात वडिलांचे नाव नाही. मग middle name काही टाकू नका.*

4) *आधारकार्ड वर जन्मतारीख फक्त वर्ष असेल तर अजिबात भरू नका. Blank सोडा.*

5) *प्रत्येक शब्दाचे स्पेलींग्ज आधारकार्ड वर जसे आहे तसे भरा.*

6) *मित्रांनो आपल्याला माहिती भरण्यासाठी जी डाउनलोड फाईल दिली आहे. तिच्या अर्ध्या भागात मुलांची माहिती दिलेली आहे. अनेक मित्रांनी तिच माहिती copy paste केली आणि पुढील कोऱ्या भागात टाकली हा शॉर्टकट वापरल्याने फाईल अपलोड केल्यानंतर mismatch File types असा error आलेला आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत copy paste करू नका. सर्व माहिती टाईप करून भरा. मित्रांनो आपल्याला हे भरायचेच आहे तर काळजी घेतलेली चांगलीच आहे ना.*

7) *जन्मतारीख 16-08-2010 अशीच नोंदवा. 16/08/2010 अशी टाईप करू नका.*

8) *Gender टाईप करू नका. त्या कॉलम मध्ये क्लिक केले की बाजूला एक छोटासा उभा बाण दिसतो त्यावर क्लीक करून निवडा.*

9) *सर्व माहिती व्यवस्थित भरली आहे याची खात्री झाली की ती फाईल Save as करायच्या अगोदर नेहमीच्या साध्या पद्धतीने Save करा. बाहेर पडा नि त्या Save केलेल्या फाईल ची copy करून इतर Drive वर आणि pendrive यामध्ये घेऊन ठेवा. याचा उद्देश एकच आहे की नंतर Save as करून csv comma delimited केलेली फाईल अपलोड केल्यानंतर जरी फाईल Error आली तरी दुरूस्ती करण्यासाठी ही दुसरीकडे Save करून ठेवलेली फाईल उपयोगी पडेल. म्हणजेच सर्व माहिती पुन्हा एकदा भरावी लागणार नाही.*

10) *आता मुळ माहिती भरलेली फाईल पुन्हा ओपन करून Save as ची प्रोसेस पुर्ण करून फाईल अपलोड करुन टाका.*

11) *आधार माहिती कोणत्याही लिपी मध्ये भरली तरी चालेल. पण शक्यतो Capital letters मध्ये भरा.*

12) *सर्वात महत्वाची गोष्ट अर्धवट माहिती भरून फाईल Save as करू नका. काही मित्र असे करतात आणि पुन्हा राहिलेली माहिती भरण्यासाठी ती फाईल ओपन करून माहिती भरतात व फाईल अपलोड करतात. अशा वेळी फाईल टाईप आपोआप बदलून Error दाखवला जातो.म्हणून सर्व माहिती भरूनच Save as ची प्रोसेस करा.*


13) *शेवटची आणि महत्वाची गोष्ट csv comma delimited केलेली फाईल पुन्हा ओपन करून पाहू नका. Csv comma delimited केली की ती अपलोड करून टाका.