Pages

Thursday 22 September 2016

अशी भरा पहिलीतील विद्यार्थ्यांची माहिती

सरल महत्वाचे :

♦ सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता १ ली च्या मुलांची माहिती student पोर्टल मध्ये कशी नोंदवावी याची सविस्तर माहिती 

✏सन २०१५-१६ या वर्षी पासून सरल मधील student पोर्टल मध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती.राज्यातील बहुतांश विध्यार्थ्यांची माहिती नोंदवली गेली असली तरी काही विध्यार्थ्यांची माहिती नोंदवण्याचे राहून गेले होते.तसेच चालू शैक्षणिक वर्षातील म्हणजेच सन २०१६-१७ ला शालेय प्रवाहात आलेले नविन विध्यार्थी आणि मागील वर्षामध्ये माहिती भरावयाचे राहून गेलेले विध्यार्थी यांची माहिती भरण्यासाठी नव्याने सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.तरी खालील माहितीप्रमाणे सर्वांनी ज्या मुलांची माहिती अद्याप student पोर्टल मध्ये नोंदवलेली नाही अशा सर्व मुलांची माहिती नोंदवावी.

टीप : 
सध्या शासनाच्या आदेशानुसार इयत्ता १ ली च्याच  मुलांचे नवीन entry म्हणून माहिती भरावयाची आहे.इतर इयत्तांचे विद्यार्थी जे मागील वर्षी सरल मध्ये नोंदले गेले नव्हते असे विद्यार्थी नोंदवण्याची सुविधा सध्या उपलब्ध करून देण्यात आलेली नाही आहे.ती सुविधा यथावकाश देण्यात येईल याची नोंद घ्यावी.

student पोर्टल मध्ये आलेल्या कोणत्याही समस्या कळवण्यासाठीची लिंक :
http://goo.gl/9vBAQ8

१) सर्वप्रथम सर्वांनी हे लक्षात घ्यावे की नविन विध्यार्थी नोंदणी ही offline पद्धतीने भरावयाची आहे.यासाठी मुख्याध्यापक login करावयाचे आहे.यासाठी www.student.maharashtra.gov.in  या website वर मुख्याध्यापक login करावयाचे आहे.त्यानंतर EXCEL या बटनावर क्लिक करून Download personal या बटनावर क्लिक करावे.

२) Download personal या बटनावर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये ज्या वर्गाच्या मुलांची माहिती भरावयाची आहे तो वर्ग dropdown box मधून select करून घ्यावा.

यानंतर ११ वी आणि १२ वी वर्गासाठी stream म्हणजेच शाखा (उदा. कला,वाणिज्य,विज्ञान) ज्या शाखा आपल्या शाळेला लागू असेल ती शाखा निवडून घ्यावी आणि Download File या बटनावर क्लिक करावे.

३)Download File या बटनावर क्लिक केल्यावर आपण निवडलेल्या वर्गाची एक excel file आणि एक  Readme file ही download करण्यासाठी उपलब्ध झालेली दिसून येईल.

Readme file :  
ही word या प्रकारात open अथवा download करण्यासाठी उपलब्ध झालेली असेल.या मध्ये आपणास नविन विद्यार्थी add करण्यासाठी महत्वाची माहिती देऊन या फॉर्म मध्ये कशा प्रकारे काम करावे याची थोडक्यात माहिती देण्यात आलेली आहे.

Excel file : 
ही file आपण select केलेल्या वर्गाची विद्यार्थी माहिती भरण्यासाठी excel या प्रकारात उपलब्ध करून देण्यात आलेली असेल.या file ला खालील प्रकारे open ऐवजी save file या बटनावर क्लिक करून शेवटी असलेल्या ok या बटनावर क्लिक करावे

४)ok या बटनावर क्लिक केल्यावर सदर excel file ही आपल्या computer मध्ये download होईल.अशा प्रकारे ज्या ज्या वर्गाची माहिती आपणास भरावयाची आहे अशा सर्व वर्गाची excel file download करून घ्यावयाची आहे याची नोंद घ्यावी.

५)सदर file ही computer मध्ये excel या प्रकारात save झालेली आपणास पहायला मिळेल.ही file save होताना MINI आणि त्यानंतर शाळेचा udise नंबर अशा नावाने save होते हे लक्षात घ्यावे.या ठिकाणी हे लक्षात घ्यावे की सदर file नाव हे कोणत्याही परिस्थितीत शेवटपर्यंत बदलावयाचे नाही आहे.नाव बदलून माहिती भरण्याचा प्रयत्न केल्यास फिले system द्वारे REJECT केली जाईल.

६)सदर excel file ही excel मधून open करावयाची आहे.अभ्यासासाठी खालील स्क्रीन पहावी.

७)सदर file ही excel च्या 'Microsoft Office (Excel)' version च्या 2003, 2007, 2010 व 2013  प्रकारात open होईल याची नोंद घ्यावी.

८) जर excel sheet हे Microsoft Office 2003 मध्ये open करत असाल तर खालील step चा वापर करा.

क) Navigate to 'Tools' tab > 'Macro' > 'Security'.

ख) Click on 'Security' option. A Security window will open.

   It will show you all the security levels that you can select for your macros.

ग) Select 'Low' Option - This setting allows all macros to run.
----------------------------------------------------------------------------- 

९)जर excel sheet हे Microsoft Office 2007 मध्ये open करत असाल तर खालील step चा वापर करा.

1) With an excel file opened click on the 'Office' button.

2) Click on 'Excel Options' (present at the bottom).

3) Select the 'Trust Center' > 'Trust Center Settings'.

4) Click on the 'Macro Settings'. Choose the security level for running macros.

5) Enable all macros (not recommended, potentially dangerous code can run)

OR

1) When you open an excel file in security warning pop-up for enable macro, click > Option

2) Select Enable Content and press OK
------------------------------------------------------------------------------ 

१०)जर excel sheet हे Microsoft Office  2010 आणि 2013 मध्ये open करत असाल तर खालील step चा वापर करा.

1) Open a Microsoft Excel file, and navigate to 'File' > 'Options' > 'Trust Center'.

   Click 'Trust Center Settings'

2) Select the 'Macro Settings' option.

3) Choose the security setting that you want to be applicable on macro execution.

4) Enable all macros (not recommended, potentially dangerous code can run)

OR

1) When you opening an excel file their is one security warning pop-up for enabable macro,

   click > Enable Content

2) Then select Eanble Content and press OK

After opening the excel file you will get 'Visual Form' for student data entry.

Form will have button as 'Insert','Update' and 'Delete'

 आता आपण Microsoft Office  2007 मध्ये काम करून सर्व माहिती सविस्तर समजून घेऊ.सर्वप्रथम download केलेल्या file ला open कसे करायचे ते पाहू.file ला open EXCEL  प्रकारात open करावे. या स्क्रीन च्या वरच्या बाजूला “Security Warning : Macros have been disabled ” अशा वार्निंगचा मेसेज दिसून येईल.त्या समोर असलेल्या option या बटनावर क्लिक करावे.त्यानंतर आपणास पुढील प्रमाणे स्क्रीन दिसून येईल.या स्क्रीन वर आपणास security Alert-macro असे page दिसून येईल.या page वर enable the content या बटनाला select करून घेऊन ok या बटनावर क्लिक करा.

११)  enable the content या बटनाला select करून घेऊन ok या बटनावर क्लिक करा;या स्क्रीन मध्ये असलेल्या तीनही tab बाबत खालील माहिती वाचा.
Insert : 
 या tab मधून आपणास नविन विध्यार्थी system मध्ये भरावयाचा आहे.

update : 
या tab मध्ये आपणास या वर्षी माहिती भरल्यानंतर असे लक्षात आले की आपली भरलेली माहिती चुकलेली आहे अशा आणि आता ती माहिती update या tab वर क्लिक करून दुरुस्थ करता येऊ शकेल.

Delete : 
या tab च्या मदतीने आपण ज्या मुलाची माहिती चुकलेली आहे आणि अशा मुलांची माहिती delete करावयाची आहे. या option चा वापर करून सदर tab च्या मदतीने आपण सदर विद्यार्थी माहिती ही excel file मधून delete करू शकतो.

Insert  या बटनावर क्लिक करून नवीन विद्यार्थ्याची माहिती भरणे 

आपण insert या बटनाला क्लीक करावे.त्यानंतर आपणासमोर खालील प्रमाणे एक स्क्रीन दिसून येईल.आता आपण सविस्तररीत्या सदर माहिती कशी भरावी हे पाहू.विद्यार्थ्याची माहिती भरताना कोणत्या ऑप्शन मध्ये काय भरावे हे समजून घेण्यासाठी खालील माहिती वाचा.

Name of student : 
या ऑप्शन मध्ये आपण विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव लिहावे.सुरवातीला first name मध्ये विद्यार्थ्याचे पहिले नाव नंतर second name  मध्ये वडिलांचे आणि last name मध्ये आडनाव असे लिहावे.एखाद्या मुलाचे नाव जर तीन फील्ड पेक्षा अधिक मोठे असेल तर  उदा. 'मोहम्मद युसूफ मोहम्मद कादरी सय्यद' असे असेल तर first name मध्ये मोहम्मद युसूफ असे लिहावे,second name मध्ये मोहम्मद कादरी असे लिहून last name मध्ये सय्यद असे लिहावे.

Date of birth :
 यामध्ये शाळेच्या  जनरल रजिस्टर मध्ये असलेली मुलाची जन्मतारीख  लिहावी.

Gender: 
यामध्ये विद्यार्थ्याचे gender नमूद करावे.

Mothers name : 
यामध्ये विद्यार्थ्याच्या आईचे संपूर्ण नाव लिहावे.

UID : 
 जर विद्यार्थ्याकडे आधार कार्ड असेल तर yes हा ऑप्शन निवडावा अथवा no असा ऑप्शन निवडावा.yes हा ऑप्शन  निवडल्यावर त्या समोरच्या रकान्यात आधार नंबर भरावा.आधार नंबर भरताना अंकाच्या मध्ये जागा न सोडता सलग भरावे.UID नसेल तर आधार कार्ड नोंदणी क्रमांक भरावयाचा नाही आहे हे लक्षात घ्यावे.अन्यथा आपली माहिती स्वीकारली जाणार नाही.

General register number : 
यामध्ये विद्यार्थ्याचा जनरल रजिस्टर नंबर नमूद करावा.हा नमूद करताना फक्त अंक भरावे.यामध्ये कोणत्याही अक्षराचा समावेश करू नये.

Date of admission: 
यामध्ये विद्यार्थ्याची शाळेत  प्रवेश घेतल्याची तारीख नमूद करावी.

Initial admition standard : 
 यामध्ये विद्यार्थ्याची आपल्या शाळेत ज्या वर्गात  प्रवेश घेतला आहे ती इयत्ता नमूद करावी.

Admission type :
 यामध्ये विद्यार्थ्याचा शाळेतील प्रवेशाचा प्रकार निवडावा.

Current standard : 
या मध्ये विद्यार्थ्याची सध्या ज्या वर्गात शिकत आहे ती इयत्ता भरावी.

Stream : 
या मध्ये 11 वी आणि 12 वी च्या मुलांसाठी शाखा निवडावी.उदा. कला, वाणिज्य, विज्ञान

Division-: 
या मध्ये विद्यार्थ्याची तुकडी नमूद करावी.

Medium: 
या ऑप्शन मध्ये विध्यार्थी ज्या माध्यमात शिकत असेल ते माध्यम निवडावे.जर आपल्या शाळेला लागू नसलेले माध्यम आपण निवडले तर सदर माहिती स्वीकारली जाणार नाही हे लक्षात घ्यावे.

Semi english :
 या मध्ये विध्यार्थी semi english मध्ये शिकत असेल तर yes भरावे अन्यथा no भरावे.

RELIGION: 
या मध्ये विध्यार्थ्यांचा धर्म कोणता आहे ते dropdown लिस्ट मधून निवडून लिहावे.

category: 
या मध्ये विध्यार्थ्यांच्या जातीची category कोणती आहे ती लिहावी.

BPL: 
यामध्ये विद्यार्थी दारिद्र्य रेषेच्या खाली असेल तर yes हा option निवडावा आठवा No.

Ade Provided By Government :
 या मध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळत असलेल्या कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत अथवा दिल्या जाणार आहे त्याविषयी माहिती भरावी.अभ्यासासाठी खालील स्क्रीन पहावी.

ही सर्व माहिती भरल्यावर स्क्रीन च्या खाली save या बटनावर क्लीक करावे.save या बटनावर क्लीक केले की Record inserted successfully असा मेसेज स्क्रीन वर दिसून येईल म्हणजे आता आपण भरलेली माहिती excel शीट मध्ये नोंद झालेली दिसून येईल.अशा प्रकारे सर्व मुलांची माहिती आपण भरून घ्यायची आहे.वर्गातील सर्व मुलांची माहिती अशा प्रकारे insert ऑप्शन मधून भरावी.आणि excel शीट तयार करावी.

♦ Update♦

या tab मध्ये आपणास या आधी माहिती भरलेल्या मुलाची माहिती चुकली होती आणि आता ती माहिती update या tab वर क्लिक करून दुरुस्थ करावयाची आहे. आपण भरलेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये काही चूक झाली असेल तर ती update करण्यासाठी आपण खालील स्क्रीन मधील update या बटनावर क्लिक करावी आणि विद्यार्थ्याच्या जनरल रजिस्टर नंबरवर क्लिक करावे.update या बटनावर क्लिक करावे.

रजिस्टर नंबरवर क्लिक केल्यावर आपणास त्या विद्यार्थ्यांची यापूर्वी भरलेली माहिती पुन्हा सदर फॉर्म मध्ये भरलेली दिसून येईल.आता आपण या फॉर्म मधील माहिती पुन्हा एकदा नव्याने update करून घ्यावी.या ठिकाणी हे लक्षात घ्यावे की या माहितीमध्ये जनरल रजिस्टर मात्र update करता येणार नाही.अशा परिस्थितीत जर आपला जनरल रजिस्टर नंबर चुकला असेल तर सदर माहिती आपणास update करता येणार नाही म्हणून ती माहती आपण delete या बटणाने delete करावी.आणि पुन्हा नव्याने त्या मुलाची माहिती insert  या बटनाला क्लिक करून भरावी.विद्यार्थी माहिती delete कशी करावी हे सविस्तरपणे खाली सांगितलेले आहे.यासाठी आपण माहिती भरताना जनरल रजिस्टर नंबर चुकणार नाही याची काळजी घ्यावी.

रजिस्टर नंबरवर क्लिक केल्यावर आपणास यापूर्वी भरलेली माहिती update च्या FORM  मध्ये दिसून येईल.सर्व माहिती update झाल्यावर शेवटी save या बटनावर क्लिक करावे.यानंतर आपणास RECORD UPADTE SUCCESFULLY असा message दिसून येईल.म्हणजे आपण सदर विद्यार्थ्याची माहिती व्यवस्थितरीत्या update केली असे समजावे.

♦ Delete♦

या tab च्या मदतीने आपण ज्या मुलाची माहिती चुकलेली आहे आणि अशा मुलांची माहिती delete करावयाची आहे. या option चा वापर करून सदर tab च्या मदतीने आपण सदर विद्यार्थी माहिती ही excel file मधून delete करू शकतो.अभ्यासासाठी खालील स्क्रीन चा अभ्यास करा.विद्यार्थी माहिती delete करण्यासाठी delete या बटनावर क्लिक करा.

स्क्रीन मधील delete या बटनावर क्लिक केल्यावर आपणास आपणास एक  फॉर्म हा स्क्रीन वर पहावयास मिळेल.delete च्या वरील form मध्ये आपण सर्वप्रथम रजिस्टर नंबर select करावे. स्क्रीन मध्ये ज्या विद्यार्थ्याची माहिती आपणास delete करावयाची असेल अशा मुलाचा जनरल रजिस्टर नंबर select करावा.जनरल रजिस्टर टाकल्यावर आपणास त्या विद्यार्थ्याची माहिती सदर फॉर्म मध्ये दिसून येईल.या माहितीच्या वरती आपणास delete हे बटन दिसेल त्या बटनावर क्लीक करावे.म्हणजे त्या विद्यार्थ्याची माहिती delete होईल आणि तशी सुचना देखील आपणास स्क्रीन वर पहायला मिळेल.अशा प्रकारे insert,update आणि delete या बटनाचा उपयोग करून आपण सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरावयाची आहे हे लक्षात घ्यावे.एकदा एका वर्गाची सर्व मुलांची माहिती भरून झाली की QUIT या tab वर select करावे.QUIT या tab ला select केल्यावर आपणास आपण भरलेल्या विद्यार्थ्याची माहितीची excel शीट दिसून येईल.त्या शीट ला आपणास .csv या format मध्ये save करायचे आहे.यासाठी खाली दाखवल्याप्रमाणे save as या बटनावर क्लिक करावे आणि त्यानंतर other format या tab वर क्लिक करावे.अभ्यासासाठी खालील स्क्रीन पहा.other format या tab वर क्लिक केल्यावर आपणास एक स्क्रीन दिसुन येईल.

सदर स्क्रीन वर दाखवल्याप्रमाणे आपणास सदर file चे नाव बदल करावयाचे नाही आहे.परंतु सदर file चा save as type हा CSV(Comma delimited (*.csv) या format मध्ये निवडून घ्यायचा आहे हे लक्षात घ्यावे.

यानंतर आपण सदर file save करून घ्यावी.

आता आपण भरलेल्या मुलांच्या माहतीची excel शीट ही CSV(Comma delimited (.csv) या format मध्ये save केलेली आहे.

यानंतर आपणास ही csv file ही upload कशी करावी हे पाहू.

माहिती upload करण्यासाठी आपण सर्वप्रथम मुख्याध्यापक यांनी आपले excel या tab ला क्लिक करून त्यानंतर upload personal या tab ला क्लिक करावे.

upload personal या tab ला क्लिक केल्यावर आपणास एक  स्क्रीन दिसेल.

त्या स्क्रीन मध्ये आपणास select file या बटनाच्या समोर असणऱ्या browse या tab वर क्लिक करावे.आणि आपण save as केलेली CSV(Comma delimited (.csv) या प्रकाराची file जी आपण या आधी तयार केलेली आहे ती येथे select करावी.

स्क्रीन मध्ये दिसत असलेल्या uplaod-step 1  या option ला क्लिक करावे.आता आपण या आधी तयार केलेल्या CSV(Comma delimited (.csv) या प्रकारच्या file मध्ये काही error आहे का हे system द्वारे चेक केली जाईल.या प्रोसेस साठी काही मिनिटे देखील लागू शकतील.त्यासाठी आपण काही काळ वाट पहावी.

ही प्रक्रिया संपल्यावर आपणास upload-step 1 is completed.please click on upload step– 2 असा संदेश दिसून येईल.

upload-step 1 is completed.please click on upload – 2 या message ला ok करावे.

अशा प्रकारे आपणास आता स्क्रीन वर आपण माहिती भरलेल्या विद्यार्थ्याची लिस्ट दिसून येईल.आता या स्क्रीन वरील upload-step 2 या बटनावर क्लिक करा.क्लिक केल्यावर प्रोसेस होण्यासासाठी पुन्हा एकदा काही मिनिटे वेळ लागू शकेल हे लक्षात घ्यावे.त्यामुळे या step ला आपण थोडा वेळ वाट पहावी.काही वेळानंतर प्रोसेस पूर्ण झाली की स्क्रीन वर data uploaded successfully असा message येईल.

अशा प्रकारे ज्या एका वर्गाची माहिती आपण upload केली आहे ती यशस्वीरीत्या upload झालेली आहे असे समजावे.तसे status मध्ये देखील विद्यार्थ्याच्या नावासमोर accepted ही notification दिसून येते.म्हणजे आपण असे समाजावे की विद्यार्थ्याची माहिती ही system मध्ये upload झालेली आहे.अशा प्रकारे आपण नविन विद्यार्थ्याची किंवा मागील वर्षी ज्या मुलांची माहिती भरली गेली नाही अशा विद्यार्थ्यांची माहिती भरावयाची आहे.आपण यावर्षी भरलेल्या विद्यार्थ्यांची माहिती Report मधील HM Level मध्ये जाऊन Personal Details Checklist – PDF या tab ला select करुन सदर वर्गाची आणि विद्यार्थ्यांची माहिती त्वरीत add झालेली पाहू शकाल याची नोंद घ्यावी.Personal Details Checklist – PDF या tab ला select केल्यावर आपणास इयत्ता १ ली च्या मुलांची pdf  मध्ये माहिती दिसून येते.अशीच माहिती आपणास Personal Details Checklist – excel ला देखील दिसून येईल.

Personal Details Checklist – PDF आणि Personal Details Checklist – excel या tab मध्ये जेंव्हा वरील माहिती प्रमाणे आपल्या शाळेच्या मुलांची माहिती दिसून येईल तेंव्हा खऱ्या अर्थाने आपल्या शाळेतील नविन विद्यार्थी add करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असे समजावे

महत्वाचे :

1)आपणास वरील महितीसाठीचे manual download करण्यासाठी http://goo.gl/qikIvJ या लिंक ला क्लिक करा.

२) duplicate विद्यार्थी सिस्टिम मधून कसे काढावे यासाठीचे मॅन्युअल डाउनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा :
http://goo.gl/7lSj8b

3)ट्रान्स्फर विनंती पाठवली जात नाही,ट्रान्स्फर विनंती approve होत नाही,approve होऊन आलेले विद्यार्थी update ला दिसत नाही अशा समस्या काही शाळांना येताना दिसून येत आहे,अशा समस्या अशाच शाळांना आहे ज्यांची मागील वर्षीच्या data मध्ये technical error आलेला आहे.उदाहरणार्थ रजिस्टर नंबर लिहिताना अंका सोबत अक्षरे भरलेले असणे,तुकडी भरताना चुकीच्या format मध्ये भरणे,मुलांची माहिती .csv मध्ये convert करून upload करताना चुका झालेल्या असणे इत्यादी.अशा शाळांना विनंती आहे की आपणास अशा समस्या असतील तर कृपया आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या समस्या सविस्तर लिहून पाठवा.आपल्या माहितीमध्ये पूर्वी झालेल्या चुका दुरुस्थ करून आपल्या या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.आपण या बाबीचा गांभीर्याने विचार केला नाही तर आपणास संच मान्यता,udise,पायाभूत चाचणी व अन्य परीक्षेचे गुण भरताना अथवा मुलाच्या लाभाच्या शासकीय योजना राबवताना online माहितीमध्ये समस्या निर्माण होऊ शकणार आहे.यासाठी आपण पुढील लिंक ला क्लिक करून आपली समस्या त्वरीत कळवा.समस्या मांडताना समस्येविषयी सविस्तर माहिती भरा.माहिती भरत असताना समस्या नसताना विनाकारण काहीही लिहित बसू नये,त्रास होईल असे लिखाण करू नये.आम्ही आपणास केवळ आणि केवळ मदत करण्याच्या हेतूने ही सुविधा उपलब्ध करून देत आहोत याची नोंद घ्यावी.
समस्या कळवण्यासाठीची लिंक :

http://goo.gl/9vBAQ8

4) आपणास सरल बाबत असलेल्या अडचणी ईमेल,व्हाट्सएप्प वर कळवाव्या,त्या सोडवन्यात येईल.अडचणी कळवन्यासाठी ईमेल :
a) Sanchmanyata@gamil.com
b) idreambest@gmail.com  किंवा
c)support.education@maharashtra.gov.in  
=========================================== 

अशी भरा आधारकार्ड माहिती


आधार अत्यंत महत्त्वाचे
पोस्ट क्रमांक 1)

                  
आधारकार्ड Excel Files डाउनलोड करून माहिती भरण्याची पद्धत (procedure)

सर्वात अगोदर Student portal वर जाऊन आपला User ID व password टाकून login करावे.

आता स्क्रीन वरील Excel tab ला टच करा.

 आता यामधील  UID Download वर CLICK करा.

 आपल्या शाळेतील वर्ग निवडा व Download वर click करा. फाईल स्क्रीन च्या खालील बाजूस डाउनलोड झालेली दिसेल.*

अशाच पद्धतीने आपल्या शाळेतील प्रत्येक वर्गाच्या एक्सेल file download करुन घ्या. सर्व फाईल्स डाउनलोड करून घेतल्या की ती स्क्रीन बंद करा.

सर्व फाईल डाउनलोड झाल्यावर नेट डाटा बंद करावा. कारण फाईल मध्ये माहिती भरण्यासाठी नेटची गरज नाही.

 ह्या Download झालेल्या file आपल्या PC किंवा laptop च्या Download फोल्डर असतात. ते फोल्डर ओपन करा.

 आता तुम्हाला ज्या वर्गाची माहिती भरायची आहे ती फाईल ओपन करा.चुकुन एखादी पट्टी आली तर त्या ठिकाणी Yes वर click करा.

 आता फाईल ओपन झाली आहे. वरच्या बाजूला आडव्या पिवळ्या पट्टी मध्ये *enable edit* वर click करा. हा OPTION नसेल तर नो प्रॉब्लेम.

आता त्या फाईल मध्ये J हा कॉलम select करा.व right clik करा आणि यामधील *format cells ला click करा.

आता यामधील  Text ला क्लिक करा.व  ok बटण दाबा.

आता आपली फाईल आधारकार्ड वरील माहिती भरण्यासाठी ready झाली आहे.

 आता हे लक्षात घ्या की मुलाच्या आधारकार्ड वर जशी माहिती असेल ती तशीच भरा. कोणत्याही परिस्थितीत दुरूस्ती वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नका.

 आधार नंबर अगदी बारकाईने लक्ष देऊन भरा. एक जरी अंक चुकला तरी त्या मुलाचा आधार नंबर match होणार नाही.

 नाव लिहिताना काही मुलांचे नाव उदा. @ निलेश शिंदे  @असे असू शकते. अशा वेळी middle name मध्ये काही लिहू नका. तो रकाना blank सोडा. अगदी तुम्हाला माहित असले तरी सुद्धा.

 आधारकार्ड वर जन्मतारीख पुर्ण नोंदलेली असेल उदा. 10/05/2005 अशी असेल तरच भरा. फक्त वर्ष नोंदलेले असेल उदा. 2008 तर अशा वेळी जन्मतारीख रकान्यात काही न लिहिता तो blank सोडा.

 Male, female जसे आधारकार्ड वर असेल तसेच सिलेक्ट करा व नोंदवा.


आता डाव्या कोपर्‍यात File नावावर click करा. त्यामधील त्यानंतर save as वर click केल्यानंतर other formats निवडा. (काही मित्रांना other formats दिसला नाही तर गडबडून जाऊ नये)

आता file name च्या ठिकाणी त्या फाईल्स चे मुळ नाव आलेले असेल.

 जर मुळ नाव आलेले नसेल तर फाईल नाव ज्या रकान्यात लिहायचे आहे तेथे फक्त *U* हे अक्षर टाईप करा. लगेच खाली नावे येतात. त्यामधील *आपण ज्या वर्गाची फाईल Save as करत आहोत त्याच वर्गाचे नाव सिलेक्ट करा.* लक्षात घ्या की नावात गडबड झाली की अपलोड करताना Error येणार.

आता फाईल नेमच्या खालील रकान्यात click करा व त्यामधील CSV Comma Delemited वर click करा.

आता त्याखालीच Save बटनावर क्लिक करा.तुमची ही csv केलेली फाईल Download फोल्डर मध्ये दिसेल. ती अपलोड करण्यासाठी ready झाली आहे.

 पण कोणत्याही परिस्थितीत CSV केलेली File ओपन करून बघू नका. आहे तशीच upload करायची आहे. जर तुम्ही अनवधानाने ओपन करून पाहिली तर ती फाईल upload करताना Error येईल व तुमची सर्व मेहनत वाया जाईल..


फाईल upload करण्यासाठी पद्धत

पुन्हा Student portal वर जाऊन आपला User ID व password टाकून login करावे.

आता स्क्रीन वरील Excel tab ला टच करा. व यामधील UID Upload वर CLICK करा.

 *Browser... ला click करून आपली फाईल ज्या ठिकाणी ठेवलेली आहे ते फोल्डर निवडा.
*File select* करा. खाली *Open* ला click करा..

आता file आली आहे. समोरच्या *upload* बटणावर click करा.

 *8 students inserted successfully* असा मेसेज आला की समजायचे आपली फाईल यशस्वीपणे अपलोड झाली. *(8च्या जागी तुम्ही जेवढ्या मुलांची आधार माहिती भरली ती संख्या दिसेल)*

 *अशी प्रोसेस प्रत्येक वर्गाच्या फाईलसाठी करायची आहे.
==================================================


(पोस्ट क्रमांक 2)
      
  save as करताना फाईल नाव सोप्या पद्धतीने कसे घ्यावे?
  
*उत्तर* - अगदी सोपे आहे. फाईल नाव ज्या रकान्यात लिहायचे आहे तेथे फक्त *U* हे अक्षर टाईप करा. लगेच खाली नावे येतात. त्यामधील *आपण ज्या वर्गाची फाईल Save as करत आहोत त्याच वर्गाचे नाव सिलेक्ट करा.* लक्षात घ्या की नावात गडबड झाली की अपलोड करताना Error* येणार.

 *मित्रांनो फाईल अपलोड करताना अनेकदा Error येत आहे. अशा वेळी कोणती काळजी घ्यावी?*

 *मित्रांनो आधार फाईल्स अपलोड Error चे प्रमाण खूप वाढले आहे. अशा वेळी आपल्याला संपूर्ण माहिती पुन्हा नव्याने भरावी लागते आणि यामध्ये आपल्याला प्रचंड मनस्ताप होतो. सर्वच डाटा पुन्हा भरणे सोपी गोष्ट नाही.*
    *तसेच अनेकदा वर्गात जर जास्त मुले असतील तर सर्व मुलांची माहिती एकाच वेळी भरणे शक्य होणार नाही अशा वेळी जेवढ्या मुलांची माहिती भराल त्यावेळी फाईल नेहमीच्या साध्या पद्धतीने Save करा. (save as नाही बरं का) त्यानंतर पुन्हा पुढच्या वेळी राहिलेली माहिती भरा. सर्व माहिती भरल्यानंतर परत एकदा साध्या पद्धतीने Save करा.*
    *आता सर्वात महत्वाची गोष्ट करायची आहे. तुमची फाईल ज्या फोल्डर मध्ये आहे. तिथे या आणि आपण साध्या पद्धतीने Save करून ठेवलेल्या फाईल copy करा आणि PC, Laptop च्या दुसर्‍या Drive मध्ये किंवा pendrive यामध्ये paste करून घ्या. म्हणजे आपला भरलेला डाटा 100% सुरक्षित झाला.*
     *हे केल्यानंतर आता आपण भरलेली मूळ फाईल ओपन करा. आणि ही फाईल Save as करून csv comma delimited मध्ये CONVERT करा.*
         *अशी प्रोसेस केल्याने जरी फाईल अपलोड केल्यानंतर Error आला तरी दुरूस्ती करण्यासाठी आपल्याला सर्व माहिती पुन्हा नव्याने भरायची गरज लागणार नाही कारण ही फाईल आपण दुसरीकडे Save करून ठेवलेली आहे.*
     *Error आला की काय चुकले ते दुरूस्त करावे लागेल. मग आपण दुसरीकडे Save करून ठेवलेली फाईल उघडा आणि दुरूस्ती करून Save as ची प्रोसेस करून फाईल पून्हा अपलोड करा.*
   हे सर्व करताना घ्यायची काळजी
*फाईल Error आली की आपल्याला दुरूस्ती करायची आहे. ही करताना आपण त्या वर्गाची अगोदर csv केलेली फाईल delete करून टाका आणि मगच दुसरीकडे Save करून ठेवलेल्या फाईल मध्ये नवीन दुरुस्ती करा.आणि नवी फाईल अपलोड करुन टाका.*

 file upload केल्यानंतर longer file name असा error आला तर काय करावे?

उत्तर - 
असा Error आलेली फाईल ज्या फोल्डर मध्ये ठेवली आहे ते फोल्डर ओपन करा. आपली फाईल कोठे आहे ते बघा. त्या फाईल च्या नावावर Right click करा. आणि नावात थोडा बदल करा. *लक्षात ठेवा की हे पूर्ण नांव delete करायचे नाही. फक्त त्यातील काही भाग कट करुन छोटे करायचे आहे.*
    उदा. पूर्वी चे 2री च्या वर्गाच्या फाईलचे नाव *UID27260607202_02_0_(3)* असे आहे तर यामध्ये बदल कसा केला ते खाली बघा.
*UID27260607202_02_0* 
म्हणजे तुमच्या लक्षात येईल की *शून्याच्या पुढे काहीच ठेवायचे नाही.* आता Enter दाबा. फाईल्स चे नाव ओके होईल. आता ही फाईल अपलोड करा.

 आधारकार्ड Excel file download करताना शाळेतील काही वर्गाच्या तुकडीतील मुलांची नावे येत नाही अशा वेळी काय करावे?

उत्तर -  
 मित्रांनो तुमच्या शाळेत समजा मागील वर्षी 3 री च्या A व B अशा 2 तुकड्या होत्या व 4 थी ची 1 च तुकडी होती. अशा वेळी 3री मधील मुले 4थी ला आली. पण सरल रेकॉर्ड ला तर 4थी ची एकच तुकडी कार्यरत असल्याने मागील एकाच तुकडीतील मुले फक्त A तुकडीत दिसतात. पण 4 थी ची B तुकडी सरलला नोंदणी केलेली नसल्याने मागील 3री B मधील मुले मुले कोठेच दिसत नाही व आधार डाउनलोड फाईल मध्ये सुद्धा येत नाही.
    म्हणून अशा वेळी आपल्याला 4थी च्या B तुकडीची सरल मध्ये अॉनलाईन निर्मिती करावी लागणार आहे. याची प्रोसेस खालीलप्रमाणे आहे.
1) Student portal open ला लॉगिन करा.
2) Master tab मधून division निवडा.
3) Standard 4 थी निवडा.
4) तुकडी टाकताना *B* न विसरता टाका.
यामधील बाकी सर्व माहिती सिलेक्ट करा. शेवटी सध्याच्या B तुकडीतील मुलांची संख्या टाका व खालील *Add* बटनाला  क्लिक करा. *Successfully* असा मेसेज येईल.
       आता तुमची 4थी ची B तुकडी तयार झाली. ही माहिती अपडेट होण्यास थोडा वेळ लागेल. *नंतर आपोआप मागील वर्षीच्या 3री B तुकडीची मुले 4थी B तुकडीत येतील.* व आधार Excel डाउनलोड फाईल मध्ये पण मुले येतील. 
====================================================



(पोस्ट क्रमांक 3)
(पोस्ट मोठी आहे पण काळजीपूर्वक वाचा. आपल्या शंकांचे निरसन होईल.
 डाउनलोड केलेल्या फाईल मधील सर्वच मुलांचे आधारकार्ड उपलब्ध नसेल तर काय करावे*

 उत्तर
सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की आपल्याला 100% मुलांचे आधार माहिती भरायची आहे. पण जर काही कारणाने सर्वच मुलांची आधार माहिती उपलब्ध नसेल तर जेवढ्या मुलांची माहिती उपलब्ध आहे तेवढ्या मुलांची माहिती भरून ती फाईल लगेच अपलोड करावी. त्यानंतर राहिलेल्या मुलांची माहिती जमा करावी. आणि पुन्हा एकदा फाईल डाउनलोड करून पुन्हा राहिलेल्या मुलांची माहिती भरण्यासाठी हीच प्रोसेस परत एकदा करायची आहे.

 मागील वर्षी आधार नंबर बरोबर असलेल्या मुलांची माहिती कोठे पाहावी?

  उत्तर- 
Student portal open केल्यानंतर Report tab मधील HM Level दिसते. त्यातील Adhar Report ला click करा.यामध्ये  All Adhar निवडा. आता तुम्हाला ज्या वर्गाची माहिती पाहायची आहे तो वर्ग टाका. तुकडी निवडा. खालील Show report ला click करा.*
       आता तुम्हाला तुमच्या वर्गातील सर्व मुले दिसतात. ज्या मुलांच्या पुढे valid Adhar असे दिसते. अशा मुलांचे आधार नंबर योग्य आहे हे आपल्याला कळेल.

 आधार च्या डाउनलोड केलेल्या Excel file मध्ये पटसंख्येपेक्षा मुले कमी का दिसतात?

  उत्तर - 
मागील वर्षी आपण मुलांची माहिती भरलेली होती. त्यामधील काही मुलांचे आधार नंबर valid (म्हणजे बरोबर) झालेले होते. ज्या मुलांचे आधार नंबर बरोबर आहेत अशा मुलांची नावे परत आधार नंबर भरण्यासाठी येणार नाहीत. म्हणून मुलांची नावे कमी दिसतात.

 आणि आधार डाउनलोड फाईल मध्ये जर मुले कमी दिसत असली तर काय करावे?

  उत्तर - मुले कमी दिसत असली तरी आपण त्याठिकाणी वाढीव मुले अॅड करू शकत नाही. म्हणून डाउनलोड फाईल मध्ये जे मुलं दिसत असतील तेवढ्या मुलांची आधार माहिती भरून फाईल अपलोड करुन टाका.

 file upload केल्यानंतर longer file name असा error आला तर काय करावे?

  उत्तर -
 असा Error आलेली फाईल ज्या फोल्डर मध्ये ठेवली आहे ते फोल्डर ओपन करा. आपली फाईल कोठे आहे ते बघा. त्या फाईल च्या नावावर Right click करा. आणि नावात थोडा बदल करा. *लक्षात ठेवा की हे पूर्ण नांव delete करायचे नाही. फक्त त्यातील काही भाग कट करुन छोटे करायचे आहे.*
    उदा. पूर्वी चे 2री च्या वर्गाच्या फाईलचे नाव UID27260607202_02_0_(3) असे आहे तर यामध्ये बदल कसा केला ते खाली बघा.
UID27260607202_02_0 
म्हणजे तुमच्या लक्षात येईल की शून्याच्या पुढे काहीच ठेवायचे नाही. आता Enter दाबा. फाईल्स चे नाव ओके होईल. आता ही फाईल अपलोड करा.
   
 आधारकार्ड चुकीची माहिती असली तरीही आपल्याला भरायची आहे. यामुळे आपल्या शाळेचा विद्यार्थी डाटा बदलेल का?
                          
 उत्तर -
 *अजिबात बदलणार नाही.* आपण हे लक्षात घ्या की आधारकार्ड वरील जशी आहे तशी माहिती भरण्यामागे एकच उद्देश आहे की ही माहिती *UID department* कडे *Verification* साठी जाणार आहे. आपण जशी आहे तशी माहिती भरल्यामुळे आपल्या मुलांचे आधार नंबर *valid* (म्हणजे बरोबर) ठरतील. आणि *तो मुलगा किंवा मुलगी हे याच शाळेत शिक्षण घेत आहेत हे सिद्ध करणे हाच शासनाचा हेतू आहे.*

विद्यार्थी आधार माहिती भरली की ती  uid मध्ये दिसते. पण आधार रिपोर्ट मध्ये दिसत नाही यासाठी काय करावे लागेल?

  उत्तर - 
आपण भरलेली माहिती ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर *UID department कडे Verification साठी जाणार आहे.* त्यांच्याकडून *Verification* झाल्यानंतरच त्याचा *Report* आधार रिपोर्ट मध्ये येईल. यासाठी मोठा कालावधी लागतो. म्हणून *आपण भरलेली माहिती लगेच आधार रिपोर्ट मध्ये येऊ शकत नाही. म्हणून आपल्याला ही माहिती UID Details मधून दिसते.*


आधारकार्ड Excel Files अपलोड केल्यानंतर भरलेली माहिती पाहण्यासाठी पद्धत (procedure)

     *मित्रांनो आपण वेबसाईटवर आधार माहिती भरल्यानंतर सर्वसाधारणपणे ही माहिती सरल सिस्टीम ला अपडेट होण्यासाठी काही वेळ लागत असतो.*
    *वेबसाइट ला लोड नसेल तर ही माहिती लगेचच अपडेट होते. व आपण लगेच पाहू शकतो. पण काही वेळा ही माहिती अपडेट होण्यासाठी 24 तासही लागू शकतात.*
                           पद्धत
 *सर्वात अगोदर https://student.maharashtra.gov.in वर जाऊन (ही वेबसाईट लगेच ओपन होते) आपला User ID व password टाकून login करावे.*

 *आता स्क्रीन वरील Report tab ला टच करा.*

 आता यामधील HM LEVEL मधील *UID Details* वर CLICK करा.

 *आपल्या शाळेतील ज्या वर्गाची आपण माहिती पाहणार आहोत तो वर्ग निवडा व Go ला click करा. थोडा वेळ लागेल. भरलेली माहिती स्क्रीनवर दिसेल.*

 *अशाच पद्धतीने आपल्या शाळेतील आपण आधार माहिती अपलोड केलेल्या प्रत्येक वर्गाची माहिती तपासून बघा.
=====================================================

(पोस्ट क्रमांक 5)

       
           एवढ्या पोस्ट केल्या पण अजूनही आधार बाबतीत काही मित्र शॉर्ट कट वापरून माहिती भरण्यासाठी प्रयत्न करतात आणि मग त्याचा परिणाम आधार फाईल अपलोड करताना Error येत आहे. म्हणून ही पोस्ट टाकण्याची वेळ आली. पण काही हरकत नाही. खाली देत असलेल्या गोष्टी काळजीपूर्वक वाचा आणि येत असलेल्या Error वर मात कराल अशी आशा आहे.*

    आधार डाउनलोड फाईल भरतांना घ्यायची काळजी

1)  *सर्वप्रथम 'J' कॉलम सिलेक्ट करून Format cell ची प्रोसेस नीट झाली आहे याची खात्री करा. प्रोसेस नीट झाली नाही तर अंक सलग न दिसता 2.456+ असे दिसतात.*

2) *आधार अंक स्पेस न देता सलग टाईप करा.*

3) *मुलाचे First name आधारकार्डवर उलटे असले तरी तुम्ही सोईचेच लिहा. उदा. More Ganesh असे असेल तरी first name 'Ganesh' लिहा.शिवाय वरील नावात वडिलांचे नाव नाही. मग middle name काही टाकू नका.*

4) *आधारकार्ड वर जन्मतारीख फक्त वर्ष असेल तर अजिबात भरू नका. Blank सोडा.*

5) *प्रत्येक शब्दाचे स्पेलींग्ज आधारकार्ड वर जसे आहे तसे भरा.*

6) *मित्रांनो आपल्याला माहिती भरण्यासाठी जी डाउनलोड फाईल दिली आहे. तिच्या अर्ध्या भागात मुलांची माहिती दिलेली आहे. अनेक मित्रांनी तिच माहिती copy paste केली आणि पुढील कोऱ्या भागात टाकली हा शॉर्टकट वापरल्याने फाईल अपलोड केल्यानंतर mismatch File types असा error आलेला आहे. म्हणून कोणत्याही परिस्थितीत copy paste करू नका. सर्व माहिती टाईप करून भरा. मित्रांनो आपल्याला हे भरायचेच आहे तर काळजी घेतलेली चांगलीच आहे ना.*

7) *जन्मतारीख 16-08-2010 अशीच नोंदवा. 16/08/2010 अशी टाईप करू नका.*

8) *Gender टाईप करू नका. त्या कॉलम मध्ये क्लिक केले की बाजूला एक छोटासा उभा बाण दिसतो त्यावर क्लीक करून निवडा.*

9) *सर्व माहिती व्यवस्थित भरली आहे याची खात्री झाली की ती फाईल Save as करायच्या अगोदर नेहमीच्या साध्या पद्धतीने Save करा. बाहेर पडा नि त्या Save केलेल्या फाईल ची copy करून इतर Drive वर आणि pendrive यामध्ये घेऊन ठेवा. याचा उद्देश एकच आहे की नंतर Save as करून csv comma delimited केलेली फाईल अपलोड केल्यानंतर जरी फाईल Error आली तरी दुरूस्ती करण्यासाठी ही दुसरीकडे Save करून ठेवलेली फाईल उपयोगी पडेल. म्हणजेच सर्व माहिती पुन्हा एकदा भरावी लागणार नाही.*

10) *आता मुळ माहिती भरलेली फाईल पुन्हा ओपन करून Save as ची प्रोसेस पुर्ण करून फाईल अपलोड करुन टाका.*

11) *आधार माहिती कोणत्याही लिपी मध्ये भरली तरी चालेल. पण शक्यतो Capital letters मध्ये भरा.*

12) *सर्वात महत्वाची गोष्ट अर्धवट माहिती भरून फाईल Save as करू नका. काही मित्र असे करतात आणि पुन्हा राहिलेली माहिती भरण्यासाठी ती फाईल ओपन करून माहिती भरतात व फाईल अपलोड करतात. अशा वेळी फाईल टाईप आपोआप बदलून Error दाखवला जातो.म्हणून सर्व माहिती भरूनच Save as ची प्रोसेस करा.*


13) *शेवटची आणि महत्वाची गोष्ट csv comma delimited केलेली फाईल पुन्हा ओपन करून पाहू नका. Csv comma delimited केली की ती अपलोड करून टाका.