Pages

Saturday 28 November 2015

Youtube Video डाउनलोड करणे

Youtube Video डाउनलोड करणे


TubeMate YouTube Downloader
यूट्यूबवरून तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही TubeMate YouTube Downloader App ची मदत घेवू शकतात. यामुळे यूट्यूबवरील व्हिडिओ थेट तुमच्या फोनच्या मेमरी कार्डमध्ये डाउनलोड होतो. विशेष म्हणजे तुम्हाला हव्या त्या क्वॉलिटीमध्ये व्हिडिओ डाउनलोड करता येतो. TubeMate YouTube Downloader वर सेटिंग देण्यात आलेली आहे. तसेच या अॅपच्या मदतीने तुम्ही इतर वेबसाइटवरूनही व्हिडिओ डाउनलोड करू शकतात.

 YTD Video Downloader
तुमच्या फोनवर इतर व्यक्ती व्हिडिओ डाउनलोड करू नये, अशी तुमची इच्छा असेल तर हे अॅप तुमच्या कामाचे आहे. YTD Video Downloader अॅपच्या मदतीने इतर व्यक्ती तुम्ही डाउनलोड केलेला व्हिडिओ देखील पाहू शकणार नाही. डाउनलोड करण्यात आलेल्या व्हिडिओला पासवर्ड द्वारा सुरक्षित करण्याची सुविधा देखील यात असते. व्हिडिओसोबतच तुम्ही ऑडिओ देखील डाउनलोड करू शकतात.

 Free YouTube Downloader for Android
तुमच्याकडे 2G नेटवर्क आहे आणि तुम्हाला यूट्यूबवरून झटपट व्हिडिओ डाउनलोड करायचा असेल तर Free YouTube Downloader for Android हे अॅप तुम्ही वापरू शकतात. हे अॅप मोफत आहे. यासोबत स्लो नेटवर्कचीही समस्या देखील दूर होते.

 FVD - Free Video Downloader
अँड्रॉइड फोनवर FVD - Free Video Downloader अॅपच्या मदतीने यूट्यूब व्हिडिओ डाउनलोड करता येत नाही. परंतु इतर साइट्सवरून व्हिडिओ डाउनलोड करता येतो. अॅप थेट इंटरनेट ब्राउझरशी कनेक्ट होतेवर डाउनलोडींग सुरु होते.

Fastest Video Downloader
 हे शानदार अॅप आहे. व्हिडिओ  1 एमबीपीएसच्या स्पीडवर डाउनलोड करतो असा दावा अॅप्स निर्मात्या कंपनीने केला आहे. एक पूर्ण मूव्ही (जवळपास 800 एमबी) 10 मिनिटांत डाउनलोड करता येते. अप मोफत आहे.

No comments:

Post a Comment