Pages

Wednesday 30 December 2015

एकाच मोबाईलवर दोन whats app

एकाच मोबाईलवर दोन whats app

एकाच मोबाइल वर दोन whatsapp Account कसे activate कराल ?

1. मोबाइल ड्यूल सिम सपोर्ट असणे आवश्यक आहे.

2.प्रथम आपल्या मोबाइल वरील whatsapp (जे google play store वरुन घेतलेला आहे) त्याचा बैकअप घ्या. ते whatsapp सेटिंग मध्ये जाउन घेता येईल.

3. आता मोबाइल सेटिंग मधील apps वर क्लिक करा. लिस्ट मधून whatsapp शोधा. त्यावर क्लिक करा क्लिअर data करून uninstall करा.

4.आता whatsmapp solo नावाचा app download करून घ्या. google play store वर उपलब्ध नाही. browser वर सर्च इंजिन मध्ये whatsmapp solo या नावाने सर्च करा किंवा मी गूगल ड्राइवचा लिंक खाली देत आहे त्यावरून डाउनलोड करून घेऊ शकता.

5. आता whatsmapp solo इनस्टॉल करा. तुमचा जूना नंबर वापरून (पूर्वी whatsapp चालु असलेला नंबर वापरून) रजिस्टर करा.

6.रिस्टोर बैकअप करा. नंबर activate होताना रिस्टोर करु का? असा विचारला जातो तेंव्हा रिस्टोर म्हणा. नको असेल तर No म्हणून पुढे जाऊ शकतो...

7.आता Google play store वरील नेहमीचा whatsapp download करा (uninstall करण्यापूर्वी app चा बैकअप घेतला असेल तर पुन्हा डाउनलोड करण्याची गरज पडत नाही) apps बैकअप clean master या app च्या सहाय्याने घेता येऊ शकते.

8. whatsapp इनस्टॉल करा. नवीन नंबर टाकून रजिस्टर करा.

आता तुम्ही दोन्ही नंबर एकाच मोबाइल वर whatsapp वापरु शकाल.

आता तुमच्या मोबाइल वर whatsapp चा दोन स्वतंत्र पण वेगळे लोगो दिसतील.

whatsmapp solo लिंक...

https://drive.google.com/file/d/0B3GArdKNGgnpNWtKdGJMUE5Ic1U/view?usp=docslist_api

**ट्रिक्स कसा वाटला नक्की कळवा**

I am successfully activated two whatsapp numbers in my mobile.....

सूत्रसंचालन

सूत्रसंचालन

सूत्रसंचालन म्हणजे काय व ते कसे करावे ? या संबंधी काही टिप्स :-
# कार्यक्रम पत्रिका:-
उदा. व्याख्यान
आगतम् स्वागतम् सुस्वागतम्
1) मान्यवरांचे आगमन/स्थानग्रहण
2) सरस्वती पूजन/दीपप्रज्वलन/प्रतिमेस पुष्पहार
3) मान्यवरांचे स्वागत/शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ.
4) स्वागतगीत
5) प्रास्ताविक
6) पाहुण्यांचा परिचय
7) मनोगत- 1, 2, 3...इत्यादी
8) भाषण / व्याख्यान-1, 2,...इत्यादी.
9) अध्यक्षीय समारोप
10) आभार
11) प्रार्थना, राष्ट्रगीत इत्यादी
〰〰〰〰〰〰〰
सूत्रसंचालकाचे काही गुण :-
@ भाषाप्रभुत्व
@ नीटनेटकेपणा
@ संवेदनशिलता
@ सभाधीटपणा
@ हजरजबाबीपणा
@ सौजन्यशिलता
@ सुक्ष्मावलोकन क्षमता
@ आंगिक हुशारी
@ चाणाक्षपणा
@ इतरांबरोबर मिसळण्याची वृत्ती
@ भावनिक सक्षमता
〰〰〰〰〰〰

सूत्रसंचालनात आवश्यक गोष्टी :-
1) कार्यक्रम पत्रिका तयार करणे
2) कार्यक्रमाचे स्वरूप लक्षात घेणे
3) कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोण? याची माहिती घेणे
4) कार्यक्रमाचे स्थळ
5) कार्यक्रमाची वेळ
6) श्रोता कोणत्या स्तरातील असेल याचा अंदाज बांधने
7) सूत्रसंचालनात कोणत्या काव्य ओळींचा उपयोग करायचा हे ठरवणे
8) आभार करणारा आहे की नाही हे पाहणे
इत्यादी
सुत्रसंचालन म्हणजे काय?
सुत्रसंचालनाची गरज...
सूत्रसंचलन हे भाग्यवंताचे काम...
सूत्रसंचलनाचे काही प्रकार...
& कवि सूत्रसंचालक
& शालेय महाविद्यालयीन कार्यक्रम
& औपचारिक कार्यक्रम
& शास्त्रीय संगीताची मैफिल
& गाण्यांचा कार्यक्रम
& राजकीय कार्यक्रम
& नैमित्तिक कार्यक्रम
& शासकीय कार्यक्रम
& सांस्कृतिक कार्यक्रम
& वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रम
इत्यादी..
@सूत्रसंचालकाचे काही गुण:-
1) हजरजबाबीपणा
2) वाचन व्यासंग
3) संग्रहन
4) वाक्पटुत्व
5) बहुश्रुतता
6) भाषाशैली
@सूत्रसंचालक होण्यासाठी पूर्वतयारी
* निरिक्षण
* वाचन
* वाचिक अभिनय
* सभाधिटपणा
* सूत्रसंचालक द्वय
* आपत्तीकालीन नियोजन
* सूत्रसंचालकाची देहबोली
* पेहरावावरही भर देण्याची गरज
* प्रत्यक्ष कार्यक्रमाची माहिती
* संहिता लेखन
* ध्वनीवर्धकाची जुळवनी
@ सूत्रसंचलनातील शिष्टाचार:-
# हे करू नका
# ते करा
@ संयोजकाशी समन्वय :-
@ संयोजनातील नियोजन
@ परिसंवाद-वादविवाद नियोजन
@ कार्यक्रमांना लागणार्या साहित्यावर एक नजर
@ माहिती तंत्रज्ञान युक्त डिजीटल सूत्रसंचालन
@ मुलाखतीचे संचालन
@ कार्यक्रम पत्रिका
@ मेहनतीच्या बळावरच सूत्रसंचालन यशस्वी होते
@ सूत्रसंचालन ही एक कला
@ सूत्रसंचालन हे एक शास्त्र आहे
@ सूत्रसंचालन -एक करिअर
@ निवेदकाची चलती
@ पाहुण्यांचा परिचय
@ सूत्रसंचालनासाठी उपयुक्त विचारवंतांची अवतरणे
@ वृत्तपत्रे आणि विचारवंतांच्या पुस्तकातून निवडलेले काही सुविचार
@ उपयुक्त संत अवतरणे
@ पंत अवतरणे
@ कवी आणि त्यांच्या काव्यपंक्ती
@ काही बहुचर्चीत कविता
@ आईच्या कविता
@ स्त्री जीवनविषयक ओव्या
@ उखाणे
@ इतर व अनेक प्रकारे माहिती गोळा करून प्रभावी सूत्रसंचालन करता येते...

Tuesday 8 December 2015

परिपाठ

परिपाठ

    MP3 परिपाठ व प्रार्थना

    # दैनिक परिपाठ - मराठी

    # दैनिक परिपाठ - इंग्रजी

    # आदर्श परिपाठचे नियोजन

    डिजीटल साउंड परिपाठ

दैनिक परिपाठासाठी महत्त्वाचे संग्रह
   # मराठी सुविचार संग्रह
   # दैनिक दिनविशेष संग्रह
   # बोधकथा संग्रह
   # सामान्य ज्ञान प्रश्नसंग्रह
   # स्फुर्तीगीते संग्रह
   # बडबडगीते संग्रह
   # छोट्यांसाठी विनोद
   # बालगीतांचा संग्रह
   # शालेय खेळ संग्रह

कुमठे बीट 10 - शब्दचक्र

कुमठे बीट 10 - शब्दचक्र

���� नमस्कार ����

कुमठे बिट शैक्षणिक अनुभव क्र.१०


✳ शब्दचक्र :

         या उपक्रमात मध्यभागी एक छोटे वर्तुळ रेखाटून त्याला वर्तुळाच्या कडेपासून बाहेर जाणाऱ्या ८ रेषा समोरासमोर काढाव्यात. या वर्तुळात कोणतेही एक अक्षर लिहून त्यापासून सुरुवात होणारे शब्द त्या ८ रेषांपुढे लिहिण्यास सांगावे.

✳ या उपक्रमातून साध्य होणाऱ्या बाबी पुढीलप्रमाणे :

 १)ध्वनिभेद :

इयत्ता १ली च्या विद्यार्थ्यांकरिता हा उपक्रम घेऊन त्यांना वर्तुळातील दिलेल्या अक्षरापासून सुरु होणारे शब्द विचारावे. यामुळे मुले त्या अक्षराचा उच्चार होणारेच शब्द सांगतात. चुकून एखाद्या मुलाने दुसऱ्या अक्षरापासून सुरु होणारा शब्द सांगितल्यास त्यांना स्वतःच त्यातील ध्वनिभेद समजतो.

२) शब्दचक्र वाचन :

इयत्ता २री च्या मुलांसाठी प्रत्येक मुलाला वेगळे अक्षर देऊन त्यापासून त्यांना ८ शब्द असलेले शब्दचक्र तयार करण्यास सांगावे. एकाने दुसऱ्याचे शब्दचक्र वाचावे तर दुसऱ्याने पहिल्याचे शब्दचक्र वाचावे. असे गटात कार्य देऊन वाचन कौशल्याचा विकास घड़वता येतो तसेच शब्द संपत्ति देखील वाढते.

३) शब्दाचा वाक्यात उपयोग :

 इयत्ता ३री व ४थी साठी याच उपक्रमाचा उपयोग करुन तयार झालेल्या ८ शब्दांचा वाक्यात उपयोग करून ८ वाक्य तयार करता येऊ शकतात. यामुळे दिलेल्या शब्दाची वाक्यात कुठे रचना करावी हे विद्यार्थ्याना समजण्यास मदत होते.

४) गोष्ट तयार करणे :

शब्दचक्रातील ८ शब्दांपासून गोष्ट तयार करण्याचा उपक्रम देखील घेऊ शकतो. तयार झालेल्या कोणत्याही शब्दांत सहसंबंध जोडून गोष्ट विद्यार्थी करू शकतात.

५) शब्दांची करामत :

हा उपक्रम देखील या शब्दचक्राद्वारे साध्य होऊ शकतो. तयार झालेल्या ८ शब्दांना योग्य "प्रत्यय" लावून शब्द करामतीचे वाक्य तयार होऊ शकते.
उदा. कविताने काकाचे कपड़े कपटात  कोंबले.

६) यमक शब्द संग्रह :

 शब्दचक्राद्वारे तयार झालेल्या ८ शब्दांचे यमक विद्यार्थ्याना विचारावे. यातून विद्यार्थी पूर्वज्ञानावर आधारित बरेच यमक शब्द सांगतात.

        असे अनेक उपक्रम या एका उपक्रमातून घेऊ शकतो.  लहान तसेच मोठ्या इयत्तेसाठी देखील हा उपक्रम उपयुक्त ठरू शकतो .
         मला या उपक्रमाचा आलेला अनुभव असा की एका गटाला एका शब्द चक्राजवळ कार्य दिल्यास माझे विद्यार्थी वरील संपुर्ण ६ प्रकारच्या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेऊन शब्दचक्र तयार करतात.यामुळे मुलांची क्रियाशिलता व शब्दसंपत्ती वाढण्यास खुपच मदत झाली .
           धन्यवाद!!

मी तयार केलेला शाळेचा पी पी टी


Saturday 28 November 2015

ब्लॉग कसा बनवावा

ब्लॉग कसा बनवावा

ब्‍लॉग कसा बनवावा.
How To Create New Blog...     
            ब्‍लॉग हे वेबलॉग या शब्‍दाचे लघुरुपांतर आहे. हा संकेतस्‍थळाचाच म्‍हणजे वेबसाईटचाच प्रकार आहे. ब्‍लॉग हे एक व्‍यक्‍ती किंवा व्‍यक्तिंचा समूह ब्‍लॉग निर्माण करतो. ब्‍लॉगमध्‍ये मजकूर, व्हिडीओज, ऑडिओज, चित्रे आणि वेबलिंक्‍स (सांधे) दिलेले असतात. नविन मजकूर ब्‍लॉगवर लिहिणे किंवा प्रकाशित करणे याला 'ब्‍लॉगिंग' असे म्‍हणतात. ब्‍लॉगवरील लेखांना 'ब्‍लॉगपोस्‍ट' 'एन्ट्रिज' म्‍हणतात. ब्‍लॉग लिहीणा-या लेखकांना ब्‍लॉगर म्‍हणून संबोधले जाते. आज ब्‍लॉगवर कोट्यावधी लेख नविन ब्‍लॉग वेबवर झळकत आहेत. चला तर मग आपणही नविन ब्‍लॉग तयार करुया.....
नविन ब्‍लॉग तयार करण्‍यासाठी आवश्‍यक घटक.....
१. स्‍वत: चा Gmail  ID
2. नेट कनेक्‍शन          
वरील दोन्‍ही गोष्‍टी उपलब्‍ध असतील तर ब्‍लॉग तयार करण्‍यासाठी काही अडचण येणार नाही फक्‍त ५ मिनीटात तुमचा ब्‍लॉग तयार होईल. सर्वप्रथम www.blogger.com या साईटवर तुमच्‍या gmail Id व्‍दारे Log  in  करा.
Log in केल्‍यानंतर Bogger Dashboard open होईल जसे...
 blogger dashboard वर  New blog असे चौकट किंवा बटन दिसेल त्‍यावर क्लिक करा लगेच दुसरा विंडो उघडेल.
जसे.....
 वरील विंडोजमध्‍ये तुम्‍हाला ब्‍लॉग टाईटल (Title) द्यावे लागेल उदा. Address मध्‍ये तुमच्‍या ब्‍लॉगला तुम्‍ही काय अड्रेस देणार आहात हे ठरवावे लागेल. तुमच्‍या नावाने अड्रेस तयार करता येईल.  किंवा blog address टाईप केल्‍यानंतर उपलब्‍ध आहे किंवा नाही तपासून पाहिले जाईल उपलब्‍ध नसेल तर sorry this blog address is not available म्‍हणून त्‍याखाली मेसेज दिसेल दुस-या नावाने प्रयत्‍न करा उपलब्‍ध असेल तर blog address is available असा मेसेज येईल available असेल तर सर्वात खाली दिसणा-या Create blog वर क्लिक करा तुमचा ब्‍लॉग तयार होईल.
जसे....
 तुम्‍ही तयार केलेला ब्‍लॉग डॅशबोर्डवर दिसू लागेल. त्‍याच्‍या खाली एक मेसेज दिसेल Start posting वर क्लिक करा किंवा पेन्सिलचा चित्र दिसत आहे त्‍यावर क्लिक करा ब्‍लॉग पोस्‍टींगचा विंडो उघडेल.
जसे....
  वरील ब्‍लॉग पोस्‍टच्‍या विंडोमध्‍ये प्रामुख्‍याने दोन गोष्‍टी महत्‍त्‍वाचे आहेत Post समोरील चौकोनात ब्‍लॉगचा Title लिहा खाली मोठा स्‍पेस दिसेल त्‍यामध्‍ये तुमचा विचार , मुद्दे , चित्रे आणि लिंक्‍स तयार करु शकता लेख पूर्ण झाल्‍यानंतर उजव्‍या बाजूला दिसणा-या Publish वर क्लिक करा तुमचा लेख ब्‍लॉगवर प्रकाशित होईल तेही कोणत्‍याही प्रकाशकाशिवाय.

Youtube Video डाउनलोड करणे

Youtube Video डाउनलोड करणे


TubeMate YouTube Downloader
यूट्यूबवरून तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही TubeMate YouTube Downloader App ची मदत घेवू शकतात. यामुळे यूट्यूबवरील व्हिडिओ थेट तुमच्या फोनच्या मेमरी कार्डमध्ये डाउनलोड होतो. विशेष म्हणजे तुम्हाला हव्या त्या क्वॉलिटीमध्ये व्हिडिओ डाउनलोड करता येतो. TubeMate YouTube Downloader वर सेटिंग देण्यात आलेली आहे. तसेच या अॅपच्या मदतीने तुम्ही इतर वेबसाइटवरूनही व्हिडिओ डाउनलोड करू शकतात.

 YTD Video Downloader
तुमच्या फोनवर इतर व्यक्ती व्हिडिओ डाउनलोड करू नये, अशी तुमची इच्छा असेल तर हे अॅप तुमच्या कामाचे आहे. YTD Video Downloader अॅपच्या मदतीने इतर व्यक्ती तुम्ही डाउनलोड केलेला व्हिडिओ देखील पाहू शकणार नाही. डाउनलोड करण्यात आलेल्या व्हिडिओला पासवर्ड द्वारा सुरक्षित करण्याची सुविधा देखील यात असते. व्हिडिओसोबतच तुम्ही ऑडिओ देखील डाउनलोड करू शकतात.

 Free YouTube Downloader for Android
तुमच्याकडे 2G नेटवर्क आहे आणि तुम्हाला यूट्यूबवरून झटपट व्हिडिओ डाउनलोड करायचा असेल तर Free YouTube Downloader for Android हे अॅप तुम्ही वापरू शकतात. हे अॅप मोफत आहे. यासोबत स्लो नेटवर्कचीही समस्या देखील दूर होते.

 FVD - Free Video Downloader
अँड्रॉइड फोनवर FVD - Free Video Downloader अॅपच्या मदतीने यूट्यूब व्हिडिओ डाउनलोड करता येत नाही. परंतु इतर साइट्सवरून व्हिडिओ डाउनलोड करता येतो. अॅप थेट इंटरनेट ब्राउझरशी कनेक्ट होतेवर डाउनलोडींग सुरु होते.

Fastest Video Downloader
 हे शानदार अॅप आहे. व्हिडिओ  1 एमबीपीएसच्या स्पीडवर डाउनलोड करतो असा दावा अॅप्स निर्मात्या कंपनीने केला आहे. एक पूर्ण मूव्ही (जवळपास 800 एमबी) 10 मिनिटांत डाउनलोड करता येते. अप मोफत आहे.

एकाच मोबाईलवर दोन whats app

एकाच मोबाईलवर दोन whats app

एकाच मोबाइल वर दोन whatsapp Account कसे activate कराल ?

1. मोबाइल ड्यूल सिम सपोर्ट असणे आवश्यक आहे.

2.प्रथम आपल्या मोबाइल वरील whatsapp (जे google play store वरुन घेतलेला आहे) त्याचा बैकअप घ्या. ते whatsapp सेटिंग मध्ये जाउन घेता येईल.

3. आता मोबाइल सेटिंग मधील apps वर क्लिक करा. लिस्ट मधून whatsapp शोधा. त्यावर क्लिक करा क्लिअर data करून uninstall करा.

4.आता whatsmapp solo नावाचा app download करून घ्या. google play store वर उपलब्ध नाही. browser वर सर्च इंजिन मध्ये whatsmapp solo या नावाने सर्च करा किंवा मी गूगल ड्राइवचा लिंक खाली देत आहे त्यावरून डाउनलोड करून घेऊ शकता.

5. आता whatsmapp solo इनस्टॉल करा. तुमचा जूना नंबर वापरून (पूर्वी whatsapp चालु असलेला नंबर वापरून) रजिस्टर करा.

6.रिस्टोर बैकअप करा. नंबर activate होताना रिस्टोर करु का? असा विचारला जातो तेंव्हा रिस्टोर म्हणा. नको असेल तर No म्हणून पुढे जाऊ शकतो...

7.आता Google play store वरील नेहमीचा whatsapp download करा (uninstall करण्यापूर्वी app चा बैकअप घेतला असेल तर पुन्हा डाउनलोड करण्याची गरज पडत नाही) apps बैकअप clean master या app च्या सहाय्याने घेता येऊ शकते.

8. whatsapp इनस्टॉल करा. नवीन नंबर टाकून रजिस्टर करा.

आता तुम्ही दोन्ही नंबर एकाच मोबाइल वर whatsapp वापरु शकाल.

आता तुमच्या मोबाइल वर whatsapp चा दोन स्वतंत्र पण वेगळे लोगो दिसतील.

whatsmapp solo लिंक...

https://drive.google.com/file/d/0B3GArdKNGgnpNWtKdGJMUE5Ic1U/view?usp=docslist_api

**ट्रिक्स कसा वाटला नक्की कळवा**

पेनड्राईव्हला पासवर्ड टाका

Pen Drive ला पासवर्ड लॉक टाका...

मित्रांनो आपल्याकडे अनेक प्रकारची माहिती संग्रहीत असते. त्यापैकी काही महत्त्वाची असते तर काही गोपनीय असते. गोपनीय डेटाला आपण आपल्या पेनड्राईव्हमध्ये ठेऊन इतरत्र जाणे, धोक्याचे असते! कारण पेनड्राईव्ह कधीही हरवू शकतो व आपली गोपनीय डेटा दुसऱ्याच्या हाती लागण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणजे पेनड्राईव्हला पासवर्डचा लॉक टाकणे होय. आता आपण जे सॉफ्टवेअरपाहणार आहोत, ते पेन ड्राईव्हमधे ठेवा आणि इन्स्टाल करुन पासवर्ड तुमच्या सोयीचा द्या..म्हणजे एक काम सोपे होईल.हा सॉफ्टवेअर डाऊनलोड करुन घेण्यासाठी येथे क्लिक करा.

सरल अपडेट्स

सरल अपडेट्स - Student Summary

��STUDENT SUMMARY मध्ये माहिती कशी भरावी?

1. सर्व प्रथम सरल प्रणालीच्या www.education.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन SCHOOL पोर्टल ओपन करावे.
2. त्यानंतर आपणापुढील screen वर STUDENT SUMMARY ची टॅब दिसून येईल तीला click करावे.
3. अता नेहमी प्रमाणे लॉगीन ची window येईल त्यात आपल्या शाळा पोर्टलच्या login ID PASSWORD ने लॉगीन व्हावे.
(लक्षात ठेवा STUDENT पेार्टलचा पासर्वर्ड या ठिकाणी वापरु नये.)
4. STUDENT SUMMARY वर लॉगीन झाल्यानंतर आडव्या मेनु मध्ये विविध नमुन्यातील (11 tab le) माहिती अचूक भरुन प्रत्येक पेज शाळा पोर्टल प्रमाणे update आणि finalize देखील करावयाचे आहे.

STUDENT SUMMARY मध्ये अंर्तभूत असणारे विविध नमुने-
Student summery form
1.इयत्ता 1 ली प्रवेश पात्र वयानुरुप मुला-मुलींची संख्या.
2.जात प्रवर्ग व इयतानिहाय मुला-मुलींची संख्या.
3.अल्पसंख्याक धर्मनिहाय व वर्गनिहाय मुला-मुलींची संख्या.
4.वर्गनिहाय वयानुरुप विदयार्थी पटसंख्या.
5.पुर्नप्रवेश जातनिहाय.
6.पुर्नप्रवेश अल्पसंख्यांक.
7.मागील वर्षातील विदयार्थी लाभच्या योजनांची सांख्यिकीय माहिती (प्राथमिक)
8.मागील वर्षातील विदयार्थी लाभच्या योजनांची सांख्यिकीय माहिती (उच्च प्राथमिक)
9.शाळेतील अपंग विदयार्थ्यांची अपंगत्वाचे प्रकारानुसार माहिती.
10.मागील वर्षी अपंगत्वाच्या साधनांचा लाभ दिलेले विदयार्थी माहिती.
11.मगील वर्षाचा इत्यंभूत निकाल.

अधिक सविस्तर माहिती वाचा>>>

सदरील माहिती ही अत्यंत सुक्ष्म स्वरुपाची असल्याने व त्यानुसारच शाळा+विदयार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळणे अवलंबून असल्याने मुख्याध्यपकांनी उपरोक्त माहिती स्वत: भरावी.  इतरांवर विसंबून राहु नये
उपरोक्त सुचनांप्रमाणे कार्यवाही अपेक्षित.