Pages

Saturday 28 November 2015

ब्लॉग कसा बनवावा

ब्लॉग कसा बनवावा

ब्‍लॉग कसा बनवावा.
How To Create New Blog...     
            ब्‍लॉग हे वेबलॉग या शब्‍दाचे लघुरुपांतर आहे. हा संकेतस्‍थळाचाच म्‍हणजे वेबसाईटचाच प्रकार आहे. ब्‍लॉग हे एक व्‍यक्‍ती किंवा व्‍यक्तिंचा समूह ब्‍लॉग निर्माण करतो. ब्‍लॉगमध्‍ये मजकूर, व्हिडीओज, ऑडिओज, चित्रे आणि वेबलिंक्‍स (सांधे) दिलेले असतात. नविन मजकूर ब्‍लॉगवर लिहिणे किंवा प्रकाशित करणे याला 'ब्‍लॉगिंग' असे म्‍हणतात. ब्‍लॉगवरील लेखांना 'ब्‍लॉगपोस्‍ट' 'एन्ट्रिज' म्‍हणतात. ब्‍लॉग लिहीणा-या लेखकांना ब्‍लॉगर म्‍हणून संबोधले जाते. आज ब्‍लॉगवर कोट्यावधी लेख नविन ब्‍लॉग वेबवर झळकत आहेत. चला तर मग आपणही नविन ब्‍लॉग तयार करुया.....
नविन ब्‍लॉग तयार करण्‍यासाठी आवश्‍यक घटक.....
१. स्‍वत: चा Gmail  ID
2. नेट कनेक्‍शन          
वरील दोन्‍ही गोष्‍टी उपलब्‍ध असतील तर ब्‍लॉग तयार करण्‍यासाठी काही अडचण येणार नाही फक्‍त ५ मिनीटात तुमचा ब्‍लॉग तयार होईल. सर्वप्रथम www.blogger.com या साईटवर तुमच्‍या gmail Id व्‍दारे Log  in  करा.
Log in केल्‍यानंतर Bogger Dashboard open होईल जसे...
 blogger dashboard वर  New blog असे चौकट किंवा बटन दिसेल त्‍यावर क्लिक करा लगेच दुसरा विंडो उघडेल.
जसे.....
 वरील विंडोजमध्‍ये तुम्‍हाला ब्‍लॉग टाईटल (Title) द्यावे लागेल उदा. Address मध्‍ये तुमच्‍या ब्‍लॉगला तुम्‍ही काय अड्रेस देणार आहात हे ठरवावे लागेल. तुमच्‍या नावाने अड्रेस तयार करता येईल.  किंवा blog address टाईप केल्‍यानंतर उपलब्‍ध आहे किंवा नाही तपासून पाहिले जाईल उपलब्‍ध नसेल तर sorry this blog address is not available म्‍हणून त्‍याखाली मेसेज दिसेल दुस-या नावाने प्रयत्‍न करा उपलब्‍ध असेल तर blog address is available असा मेसेज येईल available असेल तर सर्वात खाली दिसणा-या Create blog वर क्लिक करा तुमचा ब्‍लॉग तयार होईल.
जसे....
 तुम्‍ही तयार केलेला ब्‍लॉग डॅशबोर्डवर दिसू लागेल. त्‍याच्‍या खाली एक मेसेज दिसेल Start posting वर क्लिक करा किंवा पेन्सिलचा चित्र दिसत आहे त्‍यावर क्लिक करा ब्‍लॉग पोस्‍टींगचा विंडो उघडेल.
जसे....
  वरील ब्‍लॉग पोस्‍टच्‍या विंडोमध्‍ये प्रामुख्‍याने दोन गोष्‍टी महत्‍त्‍वाचे आहेत Post समोरील चौकोनात ब्‍लॉगचा Title लिहा खाली मोठा स्‍पेस दिसेल त्‍यामध्‍ये तुमचा विचार , मुद्दे , चित्रे आणि लिंक्‍स तयार करु शकता लेख पूर्ण झाल्‍यानंतर उजव्‍या बाजूला दिसणा-या Publish वर क्लिक करा तुमचा लेख ब्‍लॉगवर प्रकाशित होईल तेही कोणत्‍याही प्रकाशकाशिवाय.

Youtube Video डाउनलोड करणे

Youtube Video डाउनलोड करणे


TubeMate YouTube Downloader
यूट्यूबवरून तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही TubeMate YouTube Downloader App ची मदत घेवू शकतात. यामुळे यूट्यूबवरील व्हिडिओ थेट तुमच्या फोनच्या मेमरी कार्डमध्ये डाउनलोड होतो. विशेष म्हणजे तुम्हाला हव्या त्या क्वॉलिटीमध्ये व्हिडिओ डाउनलोड करता येतो. TubeMate YouTube Downloader वर सेटिंग देण्यात आलेली आहे. तसेच या अॅपच्या मदतीने तुम्ही इतर वेबसाइटवरूनही व्हिडिओ डाउनलोड करू शकतात.

 YTD Video Downloader
तुमच्या फोनवर इतर व्यक्ती व्हिडिओ डाउनलोड करू नये, अशी तुमची इच्छा असेल तर हे अॅप तुमच्या कामाचे आहे. YTD Video Downloader अॅपच्या मदतीने इतर व्यक्ती तुम्ही डाउनलोड केलेला व्हिडिओ देखील पाहू शकणार नाही. डाउनलोड करण्यात आलेल्या व्हिडिओला पासवर्ड द्वारा सुरक्षित करण्याची सुविधा देखील यात असते. व्हिडिओसोबतच तुम्ही ऑडिओ देखील डाउनलोड करू शकतात.

 Free YouTube Downloader for Android
तुमच्याकडे 2G नेटवर्क आहे आणि तुम्हाला यूट्यूबवरून झटपट व्हिडिओ डाउनलोड करायचा असेल तर Free YouTube Downloader for Android हे अॅप तुम्ही वापरू शकतात. हे अॅप मोफत आहे. यासोबत स्लो नेटवर्कचीही समस्या देखील दूर होते.

 FVD - Free Video Downloader
अँड्रॉइड फोनवर FVD - Free Video Downloader अॅपच्या मदतीने यूट्यूब व्हिडिओ डाउनलोड करता येत नाही. परंतु इतर साइट्सवरून व्हिडिओ डाउनलोड करता येतो. अॅप थेट इंटरनेट ब्राउझरशी कनेक्ट होतेवर डाउनलोडींग सुरु होते.

Fastest Video Downloader
 हे शानदार अॅप आहे. व्हिडिओ  1 एमबीपीएसच्या स्पीडवर डाउनलोड करतो असा दावा अॅप्स निर्मात्या कंपनीने केला आहे. एक पूर्ण मूव्ही (जवळपास 800 एमबी) 10 मिनिटांत डाउनलोड करता येते. अप मोफत आहे.

एकाच मोबाईलवर दोन whats app

एकाच मोबाईलवर दोन whats app

एकाच मोबाइल वर दोन whatsapp Account कसे activate कराल ?

1. मोबाइल ड्यूल सिम सपोर्ट असणे आवश्यक आहे.

2.प्रथम आपल्या मोबाइल वरील whatsapp (जे google play store वरुन घेतलेला आहे) त्याचा बैकअप घ्या. ते whatsapp सेटिंग मध्ये जाउन घेता येईल.

3. आता मोबाइल सेटिंग मधील apps वर क्लिक करा. लिस्ट मधून whatsapp शोधा. त्यावर क्लिक करा क्लिअर data करून uninstall करा.

4.आता whatsmapp solo नावाचा app download करून घ्या. google play store वर उपलब्ध नाही. browser वर सर्च इंजिन मध्ये whatsmapp solo या नावाने सर्च करा किंवा मी गूगल ड्राइवचा लिंक खाली देत आहे त्यावरून डाउनलोड करून घेऊ शकता.

5. आता whatsmapp solo इनस्टॉल करा. तुमचा जूना नंबर वापरून (पूर्वी whatsapp चालु असलेला नंबर वापरून) रजिस्टर करा.

6.रिस्टोर बैकअप करा. नंबर activate होताना रिस्टोर करु का? असा विचारला जातो तेंव्हा रिस्टोर म्हणा. नको असेल तर No म्हणून पुढे जाऊ शकतो...

7.आता Google play store वरील नेहमीचा whatsapp download करा (uninstall करण्यापूर्वी app चा बैकअप घेतला असेल तर पुन्हा डाउनलोड करण्याची गरज पडत नाही) apps बैकअप clean master या app च्या सहाय्याने घेता येऊ शकते.

8. whatsapp इनस्टॉल करा. नवीन नंबर टाकून रजिस्टर करा.

आता तुम्ही दोन्ही नंबर एकाच मोबाइल वर whatsapp वापरु शकाल.

आता तुमच्या मोबाइल वर whatsapp चा दोन स्वतंत्र पण वेगळे लोगो दिसतील.

whatsmapp solo लिंक...

https://drive.google.com/file/d/0B3GArdKNGgnpNWtKdGJMUE5Ic1U/view?usp=docslist_api

**ट्रिक्स कसा वाटला नक्की कळवा**

पेनड्राईव्हला पासवर्ड टाका

Pen Drive ला पासवर्ड लॉक टाका...

मित्रांनो आपल्याकडे अनेक प्रकारची माहिती संग्रहीत असते. त्यापैकी काही महत्त्वाची असते तर काही गोपनीय असते. गोपनीय डेटाला आपण आपल्या पेनड्राईव्हमध्ये ठेऊन इतरत्र जाणे, धोक्याचे असते! कारण पेनड्राईव्ह कधीही हरवू शकतो व आपली गोपनीय डेटा दुसऱ्याच्या हाती लागण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणजे पेनड्राईव्हला पासवर्डचा लॉक टाकणे होय. आता आपण जे सॉफ्टवेअरपाहणार आहोत, ते पेन ड्राईव्हमधे ठेवा आणि इन्स्टाल करुन पासवर्ड तुमच्या सोयीचा द्या..म्हणजे एक काम सोपे होईल.हा सॉफ्टवेअर डाऊनलोड करुन घेण्यासाठी येथे क्लिक करा.

सरल अपडेट्स

सरल अपडेट्स - Student Summary

��STUDENT SUMMARY मध्ये माहिती कशी भरावी?

1. सर्व प्रथम सरल प्रणालीच्या www.education.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन SCHOOL पोर्टल ओपन करावे.
2. त्यानंतर आपणापुढील screen वर STUDENT SUMMARY ची टॅब दिसून येईल तीला click करावे.
3. अता नेहमी प्रमाणे लॉगीन ची window येईल त्यात आपल्या शाळा पोर्टलच्या login ID PASSWORD ने लॉगीन व्हावे.
(लक्षात ठेवा STUDENT पेार्टलचा पासर्वर्ड या ठिकाणी वापरु नये.)
4. STUDENT SUMMARY वर लॉगीन झाल्यानंतर आडव्या मेनु मध्ये विविध नमुन्यातील (11 tab le) माहिती अचूक भरुन प्रत्येक पेज शाळा पोर्टल प्रमाणे update आणि finalize देखील करावयाचे आहे.

STUDENT SUMMARY मध्ये अंर्तभूत असणारे विविध नमुने-
Student summery form
1.इयत्ता 1 ली प्रवेश पात्र वयानुरुप मुला-मुलींची संख्या.
2.जात प्रवर्ग व इयतानिहाय मुला-मुलींची संख्या.
3.अल्पसंख्याक धर्मनिहाय व वर्गनिहाय मुला-मुलींची संख्या.
4.वर्गनिहाय वयानुरुप विदयार्थी पटसंख्या.
5.पुर्नप्रवेश जातनिहाय.
6.पुर्नप्रवेश अल्पसंख्यांक.
7.मागील वर्षातील विदयार्थी लाभच्या योजनांची सांख्यिकीय माहिती (प्राथमिक)
8.मागील वर्षातील विदयार्थी लाभच्या योजनांची सांख्यिकीय माहिती (उच्च प्राथमिक)
9.शाळेतील अपंग विदयार्थ्यांची अपंगत्वाचे प्रकारानुसार माहिती.
10.मागील वर्षी अपंगत्वाच्या साधनांचा लाभ दिलेले विदयार्थी माहिती.
11.मगील वर्षाचा इत्यंभूत निकाल.

अधिक सविस्तर माहिती वाचा>>>

सदरील माहिती ही अत्यंत सुक्ष्म स्वरुपाची असल्याने व त्यानुसारच शाळा+विदयार्थ्यांना विविध योजनांचा लाभ मिळणे अवलंबून असल्याने मुख्याध्यपकांनी उपरोक्त माहिती स्वत: भरावी.  इतरांवर विसंबून राहु नये
उपरोक्त सुचनांप्रमाणे कार्यवाही अपेक्षित.

Thursday 19 November 2015

सरल अपडेट

सरल अपडेट

सरल महत्वाचे : दिनांक २९/१०/२०१५
student पोर्टल विषयी:
१)      सर्वप्रथम हे सांगणे गरजेचे आहे की राज्यातील फक्त चार विभागासाठी पायाभूत चाचणीचे गुण भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.यामध्ये नासिक,औरंगाबाद,नागपूर आणि अमारावती हे विभाग समाविष्ट आहेत.इतर विभागांनी पुढील सुचना प्राप्त होईपर्यंत गुणांच्या नोंदी भरण्यासाठी प्रयत्न करून वेळ वाया घालू नये.
२)      पायाभूत चाचणीचे गुण भरण्याची सुविधा ही system वर लोड येऊ नये यासाठी पूर्णपणे offline उपलब्ध करण्यात आलेली आहे.यासाठी आपणास excel  format मध्ये शीट download करणे गरजेचे आहे.ते downlod करण्यासाठीची सुविधा ही student पोर्टल वर login च्या बाहेरच्या पहिल्याच स्क्रीन वर देण्यात आलेली आहे.या स्क्रीनवर आपणास download excel हा option दिसेल.त्यावर क्लिक करावे.त्यानतर personal आणि baseline हे दोन option आपणास दिसून येतील.यापैकी baseline हा option वर क्लिक करावे.यामध्ये आपणास udise code,password,standard, Division आणि sorting हे options दिसतील.त्या ठिकाणी योग्य ती माहिती भरून घ्यावी.याठिकाणी हे लक्षात ठेवावे की password मध्ये मुख्याध्यापकाच्या विद्यार्थी पोर्टल साठीचा जो password आहे तोच password घालणे आवश्यक आहे.जरी चुकीचा कोणताही password घातला तरी file download होयील परंतु नंतर successfully upload होणार नाही.म्हणून हा password काळजीपूर्वक घालावा.यानंतर download बटनावर क्लिक केल्यावर त्या वर्गाची exce file download होयील.अशा प्रकारे जेवढे वर असतील तेवढ्या file download करून घ्याव्यात.ज्या वर्गासाठी file download क्लारायाची आहे तो वर्ग आणि तुकडी योग्य ती नमूद करायला विसारू नये.अन्यथा upload ला समस्या निर्माण होतील.
३)      एकदा file download झाली की आपले काम सुरु होईल.सर्वप्रथम download झालेली ही file कोठे save झाली ते शोधावे.ही file शक्यतो download या फोल्डर मध्ये save झालेली दिसून येईल.या file चे नाव हे सामान्यपणे BASE या अक्षरापासून सुरु झालेली असते.BASE च्या पुढे शाळेचा udise code असतो.ती आपली download झालेली file आहे हे ओळखावे.त्या file ला right क्लिक करून rename च्या option ला क्लिक करावे.असे केले असता त्या file चे नाव select झालेले दिसून येईल.ते select झालेले नावाला right क्लिक करून copy म्हणावे.म्हणजे या file चे नाव आता copy झालेले असेल.येथे आपल्या download  केलेल्या file चे नाव copy करण्याची प्रोसेस संपते.आता याच file ला ओपण करावे.ही फाईल exce मध्ये ओपन होईल.आता पोर्टल वर सांगितल्याप्रमाणे आपणास ही file .csv format मध्ये असणे गरजेचे आहे.जोपर्यंत ही file exce मधून .csv मध्ये convert होत नाही तोपर्यंत ही file upload होणार नाही.त्यासाठी ही exce file .csv मध्ये convert कशी करावी हे समजून घेऊ.यासाठी download केलेली exce file ओपन करून घ्यावी.जी exce मध्ये ओपन झालेली स्क्रीन वर दिसेल.सर्वप्रथम exce च्या मुख्य मेनू मधील save as बटनावर क्लिक करावे.(जर हे समजले नसेल तर आपण direct F12 हे keyboard वरील बटन दाबून save as मध्ये जाऊ शकतात.)आपणा समोर एक छोटी window save as ची ओपन झालेली दिसेल.यामध्ये खालच्या बाजूला file name आणि save as type असे दोन option दिसतील.या ठिकाणी तुम्ही जी माहिती भराल ती तुमचे काम यशस्वी होण्यासाठी खूप महत्वाची आहे.
४)      file name मध्ये काय लिहावे : file name मध्ये क्लिक केल्यावर तुम्हाला curser ब्लिंक होताना दिसून येईल.त्या ठिकाणी right क्लिक केले असता paste चे बटन दिसेल.हा option select केला असता आपण यापूर्वी copy  केलेले नाव जे BASE पासून सुरु होते ते आलेले दिसेल. म्हणजे file name मध्ये ते नाव आपणास दिसून येईल.
५)      save as type मध्ये काय करावे: आता file name तर लिहून झाले.आता save as type मध्ये कोणता type select करावा हे देखील तेवढेच महत्वाचे आहे.आपण save as type ला क्लिक केले की आपणासमोर वेगवेगळ्या file format type ची लिस्ट आलेली दिसेल.यामध्ये आपणाला csv(comma delimited) अशा नावाचा format दिसेल.तो select करून घ्यावा.त्या खाली csv(macintosh ) आणि csv(ms-dos)अशा नावाचा format दिसेल तो select करू नये.आपले बरेच बांधव हा format घाईत select करतात आणि नंतर file upload होत नाही असा अनुभव येतो.त्यामुळे csv(comma delimited)हा option select करायचा आहे इतर option select करू नये.हे सर्व झाले की save बटन दाबावे.आता आपली file योग्य त्या format मध्ये तयार झालेली आहे.आता आपण या file मध्ये मुलांचे गुण भरून घ्या आणि save करा.मुलगा परीक्षेमध्ये जर गैरहजर असेल तर absent च्या coloum मध्ये yes अथवा no असे न लिहिता फक्त Y  असे लिहावे.तसे न केल्यास file upload होणार नाही हे लक्षात घ्यावे.हे करत असताना कधीकधी असेही लक्षात येते की सर्व मुलांचे student id हे समान झालेले आहेत अथवा2.01327E+18 अशा वेगळ्याच प्रकारचे दिसायला लागले आहे.तर अशा वेळी गोंधळून न जाता त्याकडे दुर्लक्ष करावे.कारण आपण file type चांगे केल्याने तसे घडले आहे.ते जरी तसे दिसत असले तरी system साठी ते योग्य तेच student id च असतात.अशा प्रकारे सर्व माहिती भरून झाली की माहिती save करावी.आता यावेळी save as करू नये.नाहीतर अजून वेगळी file तयार होयील आणि गोंधळ वाढेल.म्हणून शेवटी फक्त save म्हणावे.आता या वर्गाची file upload करण्यासाठी तयार झालेली असेल. 
६)      आपण file download करून सर्व माहिती आधी भरून नंतर देखील file name आणि file type change करू शकतात.परंतु गडबडीमध्ये file save as करायला कधीकधी विसरण्याची शक्यता आहे म्हणून आधी file name आणि type change करून घ्या.
७)      आता सदर file upload कशी करावी हे समजून घेऊ.पुन्हा एकदा student पोर्टल ला जा.login न करता त्याच पहिल्या page वर उजव्या बाजूला upload चे बटन दिसेल त्यावर क्लिक करा.यानंतर आपणास choose file अशा नावाचा option दिसेल.त्यावर क्लिक केले की तो आपणास जी file upload करायची आहे ती शोधण्यासाठी एक window open करून देयील  आपण वर तयार केलेली .csv प्रकारची file ज्या ठिकाणी save केलेली आहे तीला क्लिक करा आणि त्या विन्डोचे ओपण बटन दाबा.आता त्या file चे नाव आपणास choose file च्या समोर आलेले दिसेल.आता upload हे बटन दाबा.वात्रील प्रमाणे योग्य प्रकारे काम केले असेल तर upload sucessfully चा message येईल.जर आपनाकडून काही चूक झाली असेल तर file type mismatch असा मेसेज दिसेल.जर असा मेसेज आला तर असे समजावे की आपली काहीतरी चूक झाली आहे.अशा वेळी आपण तयार केलेली file पुन्हा एकदा चेक करून घ्या.जर आपली file sucessfully upload झाली तर आपले त्या वर्गापुरते काम संपले आहे असे समजावे. Baseline चाचणीचे Excel Sheet Upload केल्यानंतर System मध्ये File COPY होतेServer जेव्हा Freeअसेल तेव्हा सोयीने ही File System मध्ये Accept होते. File Accept or Reject झाल्यास तसा SMS मुख्याध्यापकाच्यामोबाईलवर उपलब्ध होईल.
८)      इतर महत्वाची माहिती: कधीकधी Excel Sheet download केल्यावर विद्यार्थ्यांचे नाव दिसत नाही अथवा पूर्णपणे कोरे sheet दोव्न्लोअद झालेले दिसते.अशा वेळी गोंधळून न जाता ठीओडे थांबून पुन्हा नाव्युआने download करा.कदाचित यासाठी एका पेक्षा जास्त वेळा download करून पहावे लागेल,.आपल्या शाळेचा काहीतरी प्रोब्लेम झाला की काय अथवा system hang आहे असे समजू नये.तसा कोणताही प्रोब्लेम झालेला नाही आहे.एवढे करून देखील काही प्रोब्लेम होत असेलच तर sanchmanyata@gmail.com या email वर mail करावा.ही विनंती.
९)      स्टाफ पोर्टल विषयी : a) कला शिक्षकासाठी खुशखबर.... कला शिक्षकासाठी आवश्यक असलेला ATD,AM,DILPOMA IN ART EDUCATION  तसेच FINE ART या व्यावसायिक पात्रता परीक्षा अखेर स्टाफ पोर्टल ला ADD करण्यात आलेल्या आहेत.त्या परोक्षेचे बोर्ड देखील ADD केलेले आहेत.तरी ART TEACHERS ने आपली माहिती भरून घ्यावी.
b) निमशिक्षक आणि अर्धवेळ कर्मचारी यांची माहिती उद्यापासून भरता येणार आहे. त्यासाठीचा आवश्यक प्रोग्राम तयार झालेला आहे.parateacher ची माहिती ही कशी भरावी हे आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होयील.
cज्या शाळेत काही शिक्षकांची माहिती map होत नव्हती अथवा update by headmaster करूनही saveहोत नव्हती अथवा teaching details मध्ये येत नव्हती आता उद्यापासून ती माहिती भरता येणार आहे.ही माहिती भरताना जि समस्या निर्माण झाली होती ती आज दूर झालेली आहे.ही माहिती आज संध्याकाळपासून आठवा उद्या पासून भरता येईल.आपण अशा शिक्षकांची माहिती as per sanchmanyata च्या खाली असलेला Excess  चा option निवडून भरू शकणार आहे.तो भरताना आपण अतिरिक्त नसलो तरी तो कसा भरावा अशा शंका येणे सहाजिक आहे.परंतु याबाबत घाबरून न जाता माहिती भरावी.तशी माहिती भरल्याने कोणत्याही समस्या निर्माण होणार नाही आहे.परंतु  माहिती भरली नाही तर त्या शिक्षकाची माहिती प्रशासनाला मिळणार नाही आणि समस्या निर्माण होतील.म्हणून सर्वांची माहिती लवकरात लवकर भरून घ्यावी.त्यामुळे आता स्टाफ पोर्टल ला असलेले मुख्य प्रोब्लेम दूर झाले आहे.
d) उद्यापासून स्टाफ पोर्टल मध्ये मोठा बदल पहायला मिळणार आहे.प्रशासनाच्या सोयीसाठी आणि येणाऱ्या अडचणी दूर करण्याकरता स्टाफ पोर्टल मध्ये तात्काळ लागणारी माहिती प्राधान्याने आधी भरायची आहे.यामध्ये मुख्य असणाऱ्या ६ प्रकाराबाबत माहिती प्राधान्याने भरायची सांगितली जाणार आहे.आणि ती माहिती लगेच भरून finalized करावयाची आहे.जेणेकरून ती माहिते शिक्षक सामायोजानासाठी प्रशासनाला उपलब्ध होणार आहे.ही माहिती भरून झाल्यानंतर मग उर्वरीत इतर माहिती भरायची आहे.ही ६ प्रकारची माहिती वेगळ्या colour मध्ये show होणार आहे.
e)मान्यताप्राप्त विद्यापीठाची नावे आज संध्याकाळ पर्यंत दिसणार आहेत.तसेच sociology हा विषय देखील पोर्टल मध्ये add झालेला आहे.आज संध्याकाळपर्यंत पोर्टलला दिसून येईल.
f)ctc, डीप टी,CCC,DSM ही पात्रता देखील आज संध्याकाळपर्यंत add झालेली दिसणार आहे.याव्यतिरिक्त जर कोणतीही पात्रता दिसून येत नसेल तर आज दुपार २ पर्यंत माझ्या ९४०४६८३२२९ या नंबरवर whatsapp message ने कळवावे.(कृपया call करू नये)..सदर माहिती कळवताना त्या पात्रतेच्या योग्य प्रमाणपत्राचा फोटो पाठवायला विसरू नये ही विनंती.याव्यतिरिक्त आपण sanchmanyata@gmail.com या email वर mail केला तरी चालू शकेल.
g)ज्या शिक्षकांची नावे शालार्थ आणि udise ला दिसत नाही असे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी  आणि नवीन कर्मचारी यांची माहिती जी मुख्याध्यापकाला भरता येत नाही आहे अशा कर्मचार्यांसाठीची माहिती भरण्यासाठी सध्या शिक्षणाधिकारी यांच्याकडून भरण्याची सुविधा प्राप्त आहे.ही माहिती भरण्याबाबत नव्याने काही सुचना आज संध्याकाळपर्यंत मिळण्याची शक्यता आहे.त्या सुचना स्टाफ पोर्टल वर पहायला मिळतील.तसेच माझ्या परीने देखेल मी आपनाला कळवण्याचा प्रयत्न करेल.
h)ज्या बँकेचे नाव अजूनही school पोर्टल मध्ये दिसत नाही आहे त्यांनी आमच्या havelieducation.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या आणि त्या ठिकाणी एक फॉर्म दिलेला आहे त्या फॉर्म मध्ये विचारलेली माहिती भरा.संध्याकाळपर्यंत त्या त्या बँकेची माहिती पोर्टल ला दिसून येईल.co-operative बँकेचे नाव देताना MICR NUMBER आवश्यक आहे हे विसरू नये.
i) ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठाचे  नाव अजूनही staff  पोर्टल मध्ये दिसत नाही आहे त्यांनी आमच्याhavelieducation.blogspot.in   या ब्लॉग ला भेट द्या आणि त्या ठिकाणी एक फॉर्म दिलेला आहे त्या फॉर्म मध्ये विचारलेली माहिती भरा.संध्याकाळपर्यंत त्या त्या विद्यापीठाचे माहिती पोर्टल ला दिसून येईल.सदर विद्यापीठाची मिळवलेले अहर्ता चे प्रमाणपत्र idreambest@gmail.com या email id वर mail करायला विसरू नका.
j) ज्या जातींचे नाव अजूनही school पोर्टल मध्ये दिसत नाही आहे त्यांनी आमच्याhavelieducation.blogspot.in   या ब्लॉग ला भेट द्या आणि त्या ठिकाणी एक फॉर्म दिलेला आहे त्या फॉर्म मध्ये विचारलेली माहिती भरा.संध्याकाळपर्यंत त्या त्या जातींची माहिती पोर्टल ला दिसून येईल. सदर जातीचे प्रमाणपत्र आठवा validity प्रमाणपत्र हे  idreambest@gmail.com या email id वर mail करायला विसरू नका.
वरील माहिती मी माझ्या परीने आपल्या शिक्षक बांधवाना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्या या उद्देशाने दिलेली आहे.माझ्या समजून घेण्यात देखील चुका होऊ शकतात.यासाठी finalized करण्यापूर्वी आपल्या जिल्ह्यातले,तालुक्यातील अधिकारी,MASTER TRAINER,CO-ORDINATOR इत्यादी व्यक्तीशी संपर्क साधावा.कोणत्याही मार्गाने का होयीना परंतु आपले  सरल चे काम पूर्ण व्हावे ही अपेक्षा यामागे आहे.धन्यवाद ....
   सरल बाबत अधिक आणि सविस्तर माहितीसाठी आमच्या havelieducation.blogspot.in   या ब्लॉग ला भेट द्या.या ब्लॉग वर सर्विस बुक ला वारस नोंद करायचे नमुने आणि नवीन कर्मचारी तसेच ज्यांची नावे udise आणि शालार्थ ला नाही असे कर्मचारी याना सरल ला add करायचे नमुने अर्ज download करण्याची सुविधा दिलेली आहे.त्याचा लाभ आपण घेऊ शकता.




इतर माहिती :
१)      आज मध्यरात्री १२ वाजेपर्यंत जी विद्यार्थी माहिती सरल विद्यार्थी पोर्टल मध्ये भरली जाणार आहे ती या वर्षीच्या संचामाण्यता साठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.मध्यरात्री नंतर देखील विद्यार्थी माहिती भरता येणार आहे परंतु त्यानंतर भरलेली माहिती संचामाण्याता साठी ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे अशी सुचना आजच्या व्ही सी मध्ये देण्यात आलेली आहे.त्यामुळे आज १२ वाजेपर्यंत जेवढी होयील तेवढी माहिती विद्यार्थी पोर्टल मध्ये भरावी असे आवाहन करण्यात येत आहे. भरण्यात न  येणारी माहितीमुळे जर आपल्या शाळेच्या संचामाण्यातेवर परिणाम झाला तर यासाठी शाळा जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.
२)      उद्यापासून ४ विभागात पायाभूत चाचणीचे गुण offline भरण्याची सुविधा चालू करण्यात येणार आहे.यामध्ये नासिक,औरंगाबाद,अमरावती,नागपूर हे विभाग उद्यापासून चाचणीचे गुण भरू शकणार आहेत.हे गुण भरताना student पोर्टल ला जायचे आहे.त्यामध्ये login न करता ही माहिती भरायची आहे. STUDENT पोर्टल मध्ये आपण ज्या ठिकाणी login करतो त्या login बाहेरच्या पेज वर download excel या बटनावर क्लिक करून baseline select करावे आणि student च्या पायाभूत चाचणीच्या गुणांची नोंद  भरण्याची यादी ही download करण्याची सुविधा देण्यात येणार आहे.ही यादी gender निहाय आणि अल्फाबेटीकली अशा दोन प्रकारे download करण्याची सुविधा दिली जाणार आहे.ती यादी download करावी आनि गुण भरावे व पुन्हा ही यादी upload करायची आहे.download जवळच upload ची सुविधा दिली जाणार आहे.सदर यादी download करताना शाळेचा udise no आणिPASSWORD अचूक असणे खूप महत्वाचे आहे.अन्यथा विद्यार्थ्यांचे गुण system मध्ये भरले जाणार नाही.ही यादी वर्गनिहाय वेगवेगळी download आणि upload करायची आहे.upload केलेली यादी ही त्याच दिवशी न दिसता आपल्या acount ला दुसऱ्या दिवशी आठवा २ दिवसानानंतर update झालेली दिसेल.त्यामुळे गुणांची नोंद झाली नाही म्हणून गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही.सदर प्रोसेस ही ऑफलायीन आहे.याची नोंद घ्यावी.हे गुण फक्त मुख्याध्यापकाच्या आय डी आणि password ने भरले जाणार आहे.आपले गुण नोंद झाले की मुख्याध्यापकाच्या mobile वर message देखील प्राप्त होतील की नोंद झाली अथवा नाही.जर आपण यादी download करताना  udise नंबर अथवा password चुकीचा भरला तर upload केल्यावरदेखील आपल्या गुणांची नोंद होणार नाही याची नोंद घ्यावी.इतर विभागासाठी दिल्या जाणाऱ्या तारखा ह्या २८ तारखेला कळविल्या जातील.
३)      शिक्षक माहिती देखील लवकरात लवकर पूर्ण करायची आहे जरी यासाठी अंतिम तारखा जाहीर झाल्या नसतील तरीदेखील.कारण हि माहिती सामायोजानासाठी लागाणार आहे.यामध्ये येणाऱ्या अडचणी लक्षात घेता प्रशासनाने एक वेगळी शक्कल लढविली आहे.शिक्षक माहिती भरताना जी महत्वाची माहिती आहे ती सध्या तूर्तास भरायची आहे आणि finalized करायची आहे.यामध्ये एकूण ६ प्रकारची माहिती प्राधान्याने पूर्ण करायची आहे.त्या महत्वाच्या बाबी अथवा मुद्दे कोणते हे स्टाफ च्या पोर्टल वर सांगण्यात येणार आहे.या महत्वाच्या मुद्द्यांना लक्षात येण्यासाठी वेगळा रंग देण्यात येणार आहे म्हणजे आपल्या त्या महत्वाच्या बाबी लगेच लक्षात येतील.त्या बाबीची  पूर्तता करून finalized केल्यावर उर्वरीत माहिती भरायची आहे आणि ती सुद्धा finalized करायची आहे.त्यामुळे स्टाफ मध्ये ज्या बाबी दिसत नव्हत्या आठवा save होत नव्हत्या ते प्रश्न आता उद्भवणार नाही.कदाचित ही माहिती आपणास उद्या अथवा परवा स्टाफ पोर्टल ला दिसेल.
४)      शाळा माहिती लवकरात लवकर पूर्ण करावयाची आहे.ज्या शालेंची माहिती finalized झालेली आहे त्या शाळेची माहिती cluster level वरून finalized करायची आहे.आणि गटशिक्षणाधिकारी यांनी देखील cluster level वरून आलेली माहिती तपासून finalized करायची आहे.शाळा आणि cluster level वरून संपूर्ण माहिती finalized केल्याशिवाय सदर माहिती गटशिक्षणाधिकारी यांच्या login ला पहायला मिळत नव्हती परंतु आता ही माहिती पाहता येणार आहे.आणि त्यांना हवी ती स्क्रीन रिजेक्ट देखील करता येणार आहे.
५)      नवीन शाळा स्थापन झालेली असेल तर त्यांना मागील वर्षांची माहिती भरता येत नव्हती त्यामुळे त्यांचे काम थांबले होते परंतु उद्यापासून नवीन शाळेना आता शाळा माहिती भारता येणार आहे.अशा शाळेनी मागील वर्षाची माहिती भरू नये याची नोंद घ्यावी.नाही भरली तरी अशा शाळा finalized करता येतील.
 ६)      या वर्षीच्या नवीन शाळांची विद्यार्थी माहिती भरताना तुकडी तयार करता येत नव्हती.आता त्या error मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे.आता तुकडी तयार केली जाऊ शकते.ती सुविधा चालू झालेली आहे.
  ७)      जर शाळेत एकाच मुलाची माहिती दोनदा नोंदली गेली असेल तर त्या २ नावापैकी एक नाव delete करून टाकायचे आहे.ही प्रोसेस देखील मध्यरात्री पर्यंत करायची आहे.आपल्या शाळेत असे दोन वेळा नाव नोंद केले गेलेले आहे अथवा नाही ही मुख्याध्यापकाच्या login ला दिसणार  आहे.जर एकाच नाव हे जिल्ह्यात २ ठिकाणी नोंदले गेले असेल तर अशा मुलांचा शोध हा शिक्षणाधिकारी यांच्या login ला लागणार आहे.अशा मुलांपैकी मुलगा नेमका कोणत्या शाळेत आहे याची शहानिशा करून ज्या शाळेत तो मुलगा जातो त्या शाळेत त्याला ठेवला जायील आणि दुसर्या शाळेतून तो विद्यार्थी काढला जायील.
  ८)      ज्या शिक्षकांची नावे फक्त udise मध्ये आहे अशा शिक्षकांची जर जन्मतारीख चुकली असेल तर अशा तारखा गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे दुरुस्थी साठी न्व्हते परंतु आता ते करता यावे यासाठी login ला एक change in database या अर्थाचा एक फॉर्म उपलब्ध करून दिला जाणार आहे.
९)      निमशिक्षकांची माहिती भरण्याचे अधिकार मात्र शिक्षणाधिकारी यांना देण्यात आलेले आहे.अशा शिक्षकांनी मा.शिक्षणाधिकारी यांच्याकडे संपर्क साधावयाचा आहे.यात विलंब होऊ देऊ नये याची नोंद घ्यावी.
 १०)  आता फक्त शालार्थ ने देखील map करता येऊ शकणार आहे.यामुळे बर्याच शिक्षकांची माहिती भरता येणार आहे  
 ११)  आपल्या शाळेतील किती विद्यार्थ्यांची माहिती भरली गेलेली आहे ही माहिती आता एका बटनावर क्लिक केले की समजणार आहे.ही माहिती वर्ग आणि तुकडी नुसार देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.अशी सुविधा student पोर्टल ला देत आहे असे समजलेले आहे.
  १२)  मा.शिक्षणाधिकारी यांनी संस्था नोंदणी प्राधान्याने करायचे आहे.त्यामुळे संस्थांनी आपली संस्था नोंद करून घ्यायची आहे.संस्था नोंद जर केली नाही तर इतर माहिती स्वीकारली जाणार नाही.याची नोंद घ्यावी.

१3)  सर्वांना विनंती आहे की आपण विद्यार्थी माहिती आज मध्यरात्री पर्यंत पूर्ण करावी आणि इतर राहिलेली माहिती ही  ३० तारखेपर्यंत पूर्ण करायचा प्रयत्न करायचा आहे.




सर्विस बुक मध्ये वरसाच्या नोंदी साठी नमूना मिळवण्यासाठी खालील डाऊनलोबटनवर क्लिक करा
         DOWNLOAD

सरल मध्ये काही शिक्षकांचे 30/09/2014 पूर्वी नोकरीला लागूनही शालार्थ आणि udise मध्ये नाव दिसून येत नाही आहे.तसेच काही शिक्षक हे 30/09/2014 नंतर रुजू झालेले आहे ते सुद्धा शालार्थ आणि udise मध्ये नाव दिसून येत नाही आहे..तसेच काही नवीन नियुक्ती मिळालेले शिक्षक आहेत त्यांनाही सरलचा फॉर्म भरता येत नाही.अशा शिक्षकांनी त्यांची माहिती मा.गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत मा.शिक्षणाधिकारी यांच्याकडे विहीत नमुन्यात पाठवायची आहे.त्या शिक्षकांना सरल मध्ये add करायचे अधिकार फक्त आणि फक्त शिक्षणाधिकारी यांना आहे.तो नमूना आपनासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आपण खालील लिंक open करून सदर फॉर्म डाऊनलोड करून प्रिंट करून घ्यावी ही विनंती.धन्यवाद... येथे क्लिक करा.

Wednesday 18 November 2015

रचनावादी लेखमाला


चला रचनावाद समजून घेऊया, रचनावादी शाळांची वा त्यांच्या उपक्रमांची थोडक्यात ओळख करुन देणाऱ्या खालील विविध लेखांचा अभ्यास करुया.

1. संकल्पना समजून घेऊया.
विविध मान्यवरांचे लेख

2. सकट दाम्पत्याची कर्डेलवाडीची शाळा
संपादक- उत्तम कांबळे

3. मलेशियाची ढगातील शाळा
संपादक-गजानन दिवाण

4. कुमठे बीट
संपादक- प्रतिभा भराडे

5. कुमठे बीट-शैक्षणिक प्रेरणास्थान
संपादक- सोमनाथ वाळके

6. प्रतिभा भराडे मँडम
संपादक- भाऊसाहेब चासकर

Sunday 1 November 2015

पदवीधर नाव नोंदणी

पदवीधर नाव नोंदणी

नमस्कार मिञांनो
पदविधर मतदार संघामधे नाव नोंदनी सूरू झाली असून दि.1 आक्टो. ते 15 नोव्हे.2015 पर्यंत फाॅर्म नं.18 भरुन नाव नोंदनी करता येईल आपण स्वत: नोंदणी करुन इतरांनही सांगा
नाव नोंदनीसाठी पात्रता

1) कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठा ची दि.31/10/2012
     पूर्वीची पदवी..

१८ नंबरचा फाॅर्म मिळविण्यासाठी खाली क्लिक करा..

Wednesday 28 October 2015

सरल मध्ये पायाभूत चाचणीचे गुण नोंद तक्ता नमुना [माहितीसाठी]

पायाभूत चाचणीचे गुण सरल विद्यार्थी संकेत स्थळावर भरावयाचे आहेत. त्यासाठीचा  गुण संकलन तक्ता येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यात माहिती भरून ठेवल्यास सरल विद्यार्थी संकेत स्थळावरील फाईलमध्ये विद्यार्थी गुण भरणे सुलभ होईल. गुण संकलन तक्त्यात विद्यार्थ्यांची नावे मुले मुली एकत्रित त्यांच्या प्रथम नावाच्या शब्द वर्णानुक्रमे (alphabetical order) लिहावीत. प्रत्येक वर्गास व तुकडीस स्वतंत्र तक्ते वापरावेत. 
download

Monday 19 October 2015

मोबाईलवर व्हिडिओ क्लिप कशी तयार करावी?

मोबाईलवर व्हिडिओ क्लिप कशी तयार करावी? ते आपण जाणून घेऊ या.      मित्रहो आज आपल्याला आपल्या मराठी शाळा टिकवण्यासाठी खुप खुप प्रयत्नांची गरज आहे त्यासाठी प्रथम आपल्याला आपल्या शाळेतील बाहेर शिकण्यासाठी जाणारे विद्यार्थी थांबवावे लागतील,त्यांची उपस्थिती टिकवावी लागेल सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुणवत्ता खुपच वाढवावी लागेल यासाठी आपले अध्ययन अध्यापन आनंददायी, मनोरंजक करण्याचे आपल्याला अधिकाधिक प्रयत्न करावे लागतील करिता आपल्याला डिव्हिडि प्लेयर,टीव्हि,साउंड सिस्टम,संगणक,मोबाईल यांची जास्तीत जास्त मदत घ्यावी लागेल असे मला वाटते.                          यासाठी आपल्याला विविध विषय त्यातील घटक,काही संबोध स्पष्ट करण्यासाठी,आपली अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सोपी,आनंददायी व मनोरंजनात्मक करण्यासाठी आपल्याला आपल्या ANDROID मोबाईलवर व्हिडिओ क्लिप तयार करता येईल ते कसे तयार करावे ते जाणून घेउया. सर्व प्रथम विविध विषयांसाठी आपल्या मोबाईल मध्ये एडिट केलेल्या ईमेज असाव्यात या ईमेज एडिट करण्यासाठी picscaypro say,picsart,baner maker,art studio इ.APP चा उपयोग करु शकतो. सर्वप्रथम आपल्याला व्हिडिओ क्लिप तयार करण्यासाठी APP कोणकोणते हे माहिती असायला हवे.ते खालीलप्रमाणे- mini movie,videocollage maker,clipmix,magic clip,video editer अजुनही इतर APP असतील तेंव्हा यापैकी आपण video editer या  APP चा आपल्याला अतिशय सोप्या पध्दतीने उपयोग करता येतो.      प्रथम प्लेस्टोर मधुन हे APP डाउनलोड करा वरिल ईमेज मध्ये दिसतेय ते APP डाउनलोड करा APP डाउनलोड झाल्यानंतर त्यास ओपन करा APP ओपन केल्यानंतर वरिल ईमेजमध्ये दर्शविल्याप्रमाने क्लिक करा व्हिडिओ एडिटवर क्लिक केल्यानंतर याप्रमाणे विविध फ़ोटो अल्बम दिसतील या विविध फ़ोटो अल्बम मधून जे जे फ़ोटो हवे असतील ते निवडा तयार झालेल्या व्हिडीओ क्लिपला तुम्हाला आवडत असलेली थीम निवडा तयार झालेल्या व्हिडिओ क्लिपला फ़िल्टर करा तयार झालेल्या व्हिडीओ क्लिपला तुमच्या मुजिक अल्बममधुन योग्य असे गाणे निवडून संगीत द्या याप्रमाणे हि व्हिडीओ क्लिप तयार झाल्यानंतर माय व्हिडिओ येथे क्लिक करुन आपण हि क्लिप पाहू शकतो. जर आपणास Laptop किंवा Desktop मध्ये व्हिडिओ क्लिप तयार करावयाची असल्यास पुढील सोफ़्टवेअर डाउनलोड करा.  avs4u या वेबसाइट वरुन camtasiastudio हे सोफ़्टवेअर डाउनलोड करा.